Headlines

वसंत शिशुवाटिकेची वारकरी दिंडी उत्साहात


सावंतवाडी प्रतिनिधी : भारतीय संस्कृतीचा परिचय व्हावा, या उद्देशाने विद्याभारती संचलित वसंत शिशुवाटिका येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

या दिंडीत वारकरी संतांच्या वेशभूषेत शिशूंनी उत्साहाने सहभाग घेतला. माठेवाडा, सावंतवाडी येथील शिशुवाटिकेतून सुरू झालेली ही दिंडी उभा बाजार, शिवाजी पुतळा, गांधी चौक, जयप्रकाश चौक मार्गे विठ्ठल मंदिरात पोहोचली. या दिंडीत शिशुवाटिकेच्या सर्व दीदी, पालक, शिक्षक समितीचे सदस्य तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. विठ्ठल मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर मुलांनी अभंग गायन केले आणि विठ्ठलनामाचा गजर केला.

यावेळी सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले या देखील विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मंदिरात आल्या होत्या. त्यांनी शिशुवाटिकेतील या छोट्या वारकऱ्यांसोबत काही क्षण घालवले. तसेच सर्व मुलांचे कौतुक करून, अशा प्रकारचे संस्कारक्षम आणि भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारे उपक्रम सातत्याने आयोजित व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत