पथ विभागाकडे फक्त २३७१ किलोमीटरच्याच रस्त्यांची नोंद आहे. त्यापेक्षा घनकचरा विभागाकडील रस्त्यांची नोंद साडेचार हजार किलोमीटरने अधिक असल्याने ही ‘करामत’ नेमक्या कोणाच्या फायद्यासाठी असा सवाल उपस्थित होत आहे.
झाडणकामाच्या व्यवस्थेत मोठा बदल
स्वच्छतेबाबतच्या तक्रारी, झाडणकामातील अनियमितता आणि ठेकेदारांवरील कमजोर नियंत्रण यामुळे महापालिकेने रस्ते झाडणकामाच्या व्यवस्थेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर सध्या झाडणकाम करणारे कंत्राटदाराच ४,७०९ अतिरिक्त कंत्राटी कामगार नेमतील.
हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांसाठी दंड
त्यासाठी दरमहा १३.७८ कोटी रुपये मोजले जातील. हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर प्रथमच टप्प्याटप्प्याने दंडआकारण्याची आणि वारंवार निष्काळजीपणा झाल्यास ठेका रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
रस्त्यांची लांबीची नोंद बघून पथ विभागातील अधिकारी आश्चर्यचकित
रस्त्यांची जबाबदारी पथ विभागाकडे आहे. पथ विभागाकडे शहरातील रस्त्यांची लांबी, रुंदी आणि प्रकार (डांबरी, सिमेंट, कच्चा) यानुसार नोंद आहे. असे असताना घनकचरा विभागाने दाखवलेल्या शहरातील रस्त्यांच्या लांबीमुळे पथ विभागातील अधिकारी आश्चर्यचकित झाले आहेत. हाच आक्षेप महापालिकेच्या दक्षता विभागानेही घेतला होता; परंतु त्याकडे काणाडोळा केल्याची चर्चा आहे.
नेमका प्रस्ताव
६८९२ किलोमीटर झाडकाम कंत्राटासाठी महापालिकेने दाखवलेली रस्त्यांची लांबी , २३७१ किलोमीटर पथ विभागाकडील नोंद असलेली रस्त्याची लांबी.आणि ४५२१ किलोमीटर अतिरिक्त दाखवलेल्या रस्त्यांची लांबी परंतु नेमका प्रस्ताव पुढील प्रमाणे
. शहरात ६८९२ किलोमीटर लांबीचे रस्ते
. ७०० मीटर अंतरासाठी एक सेवक या सूत्रानुसार १२,१२८ कर्मचाऱ्यांची गरज आहे.
. ४४०९ कर्मचारी झाडणकाम करतील
. पथ विभागाने शहरात २३७१ किलोमीटरचेच रस्ते असल्याचे सांगितल्याचेही याच प्रस्तावात नमूद
उपायुक्त , अतिरिक्त आयुक्त , विरोधी पक्षनेते यांच्या प्रतिक्रिया
या सगळ्या प्रकरणावर उपायुक्त , अतिरिक्त आयुक्त आणि विरोधी पक्षनेते यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. ” रस्त्यांची लांबी निश्चित करण्यासाठी घनकचरा विभागाचे मुकादम, आरोग्य निरीक्षक आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीचा आधार घेण्यात आला आहे.प्रभागरचनेसाठीच्या हद्दींचे नकाशे आणि गुगल मॅपद्वारे पडताळणी झाली. त्यात नऊ हजार किलोमीटरचे रस्ते आढळले.” अशी प्रतिक्रिया घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांनी दिली.
“महापालिकेचे रोड अॅसेट्स मॅनेजमेंट सिस्टीम अर्थात रॅम्स हे वाहन शहरात फिरवून रस्त्यांची मोजणी करण्यात आली आहे.त्यानुसार शहराची मूळ व विस्तारित हद्द मिळून २,३७१.८७ किलोमीटरचे रस्ते आहेत.घनकचरा विभागाचा प्रस्ताव व त्यातील रस्त्यांच्या लांबीबाबत कल्पना नाही.”अशी प्रतिक्रिया ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त यांनी दिली
“रस्त्यांची अधिकृत नोंद पथ विभागाकडे आहे. त्यामुळे रस्त्यांची लांबी निश्चित करताना त्यांचीच आकडेवारीचा ग्राह्य धरली पाहिजे. घनकचरा विभागाने आकडेवारी कोणत्या मापदंडांवर आणि कशी तयार केली , हे स्पष्ट होत नाही.तफावतीचा मुद्दा ‘जीबी’त मांडणार आहे .अशी प्रतिक्रिया विरेधी पक्षनेते नीलेश निकम यांनी दिली.

