Mumbai HC Directed To BMC: मुंबईतील कोणत्याही नागरिकाला सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकण्याचे स्वातंत्र्य नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे ही देखील मुंबईत गंभीर समस्या आहे.

पुणे जिल्ह्यातील मोशी येथे अलीकडेच कचरा प्रक्रिया प्रकल्पाची इमारत कोसळल्याच्या घटनेचा उल्लेख करून, मुंबईतही कचऱ्याचे मोठमोठे ढीग असल्याने अशी दुर्घटना येथे घडता कामा नये, असेही न्यायालयाने सुनावणीदरम्यान नमूद केले.
Devendra Fadnavis: शेतकऱ्यांना ‘दुबार’ दिलासा! कर्जमाफीपाठोपाठ 48 हजार कोटींच्या वीजबिलमाफीची मुख्यमंत्र्यांची घोषणा
कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडमधील दुर्गंधीच्या समस्येच्या निमित्ताने अनेक जनहित याचिकांवरील पुढील सुनावणी न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. आरती साठे यांच्या खंडपीठासमोर झाली. तेव्हा, पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे ८ जुलै रोजी मुसळधार पावसानंतर जुन्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये अनेक वर्षे साचलेला व प्रक्रिया न केलेला घनकचरा आणि औद्योगिक भंगाराचा प्रचंड ढिगारा कोसळून दोन मजली इमारतीवर पडल्याच्या दुर्घटनेचा मुद्दा चर्चेला आला. त्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला. ‘मुंबईत कचऱ्याचे उंच ढिगारे आहेत. अशी घटना मुंबईत घडता कामा नये’, असे नमूद करतानाच कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होण्याची गरज खंडपीठाने व्यक्त केली.
आपल्या देशात तो जणू राष्ट्रीय छंदच बनला आहे, अशी टिप्पणी खंडपीठाने केली. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास नव्या नियमावलीप्रमाणे आकारला जाणारा केवळ अडिचशे रुपयांचा दंड अत्यल्प असून तो वाढवून अडीच हजार रुपये करण्याची सूचनाही खंडपीठाने महापालिकेला केली.
Tukaram Mundhe : ब्रँडवर अंधविश्वास नको! भेसळयुक्त दूध ओळखायचं कसं? तुकाराम मुंढेंनी सांगितल्या प्रत्येकाने लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी
दुर्गंधीवरील उपाय समाधानकारक
कांजूर डम्पिंगमधून निघणारी दुर्गंधी आता खूप प्रमाणात कमी झाली असल्याचे याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. अभिजीत राणे यांनी सांगितल्यानंतर याविषयी महापालिका व कंत्राटदार कंपनीने केलेल्या उपायांविषयी खंडपीठाने समाधान व्यक्त केले. तथापि, या प्रकल्पातून उत्सर्जन होणाऱ्या काही घटकांबाबत राणे यांनी चिंता व्यक्त केली. त्यामुळे खंडपीठाने त्यांना याविषयी महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवण्यास सांगून या प्रशासनांकडून चार आठवड्यांनी माहिती मागितली.
Eknath Shinde : सध्या व्हॅकेन्सी आहे का? मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांचा मिश्किल सवाल
न्यायालय म्हणाले…
-इंदूरला सलग आठव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळाला. हे तेथील महापालिका अधिकाऱ्यांच्या बांधीलकीमुळे शक्य झाले
-मुंबईत असे का होऊ शकत नाही? मुंबई महापालिकेकडे प्रचंड साधनसामग्री आहे
-इच्छाशक्ती असेल तर हे साध्य करणे कठीण नाही
-घनकचरा व्यवस्थापन नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी सततचे प्रयत्न आवश्यक आहेत
-नागरिकांनाही सामाजिक भान नाही. कारण रस्त्यांवर आणि प्रवासादरम्यानही बिनदिक्कतपणे सार्वजनिक ठिकाणांवर कचरा टाकला जातो
-यामुळेच पावसाळ्यात रस्ते तुंबण्याचे प्रकार होता
-त्यामुळे व्यापक जनजागृतीसह दंडात्मक कारवाईची पावले उचलणे आवश्यक आहे
-महापालिका आयुक्तांनी प्रत्येक प्रभाग अधिकाऱ्यांना आपापल्या भागांत नियमितपणे लक्ष ठेवून कचरामुक्त रस्ते व स्वच्छतेसाठी उपाय योजण्याचे तसेच त्याविषयीचे अहवाल महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश द्यावेत

