Headlines

Mumbai News: मुंबई सर्वांत स्वच्छ का नाही? उच्च न्यायालयाचा प्रश्न; उपाय योजण्याचे महापालिकेला निर्देश – mumbai hc questions why mumbai is not cleanest city directs bmc remedial measures


Mumbai HC Directed To BMC: मुंबईतील कोणत्याही नागरिकाला सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकण्याचे स्वातंत्र्य नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे ही देखील मुंबईत गंभीर समस्या आहे.

मुंबई हायकोर्ट
मुंबई हायकोर्ट(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : इंदूरला देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळू शकतो, तर मुंबईलाही स्वच्छतेच्या बाबतीत तेच यश का मिळू शकत नाही? असा प्रश्न उपस्थित करत मुंबईतील सार्वजनिक रस्ते कचरामुक्त ठेवणे हे मुंबई महापालिका अधिकाऱ्यांचे कर्तव्य असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नमूद केले.

पुणे जिल्ह्यातील मोशी येथे अलीकडेच कचरा प्रक्रिया प्रकल्पाची इमारत कोसळल्याच्या घटनेचा उल्लेख करून, मुंबईतही कचऱ्याचे मोठमोठे ढीग असल्याने अशी दुर्घटना येथे घडता कामा नये, असेही न्यायालयाने सुनावणीदरम्यान नमूद केले.

Maharashtra TimesDevendra Fadnavis: शेतकऱ्यांना ‘दुबार’ दिलासा! कर्जमाफीपाठोपाठ 48 हजार कोटींच्या वीजबिलमाफीची मुख्यमंत्र्यांची घोषणा
कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडमधील दुर्गंधीच्या समस्येच्या निमित्ताने अनेक जनहित याचिकांवरील पुढील सुनावणी न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. आरती साठे यांच्या खंडपीठासमोर झाली. तेव्हा, पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे ८ जुलै रोजी मुसळधार पावसानंतर जुन्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये अनेक वर्षे साचलेला व प्रक्रिया न केलेला घनकचरा आणि औद्योगिक भंगाराचा प्रचंड ढिगारा कोसळून दोन मजली इमारतीवर पडल्याच्या दुर्घटनेचा मुद्दा चर्चेला आला. त्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला. ‘मुंबईत कचऱ्याचे उंच ढिगारे आहेत. अशी घटना मुंबईत घडता कामा नये’, असे नमूद करतानाच कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होण्याची गरज खंडपीठाने व्यक्त केली.

आपल्या देशात तो जणू राष्ट्रीय छंदच बनला आहे, अशी टिप्पणी खंडपीठाने केली. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास नव्या नियमावलीप्रमाणे आकारला जाणारा केवळ अडिचशे रुपयांचा दंड अत्यल्प असून तो वाढवून अडीच हजार रुपये करण्याची सूचनाही खंडपीठाने महापालिकेला केली.

Maharashtra TimesTukaram Mundhe : ब्रँडवर अंधविश्वास नको! भेसळयुक्त दूध ओळखायचं कसं? तुकाराम मुंढेंनी सांगितल्या प्रत्येकाने लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी
दुर्गंधीवरील उपाय समाधानकारक
कांजूर डम्पिंगमधून निघणारी दुर्गंधी आता खूप प्रमाणात कमी झाली असल्याचे याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. अभिजीत राणे यांनी सांगितल्यानंतर याविषयी महापालिका व कंत्राटदार कंपनीने केलेल्या उपायांविषयी खंडपीठाने समाधान व्यक्त केले. तथापि, या प्रकल्पातून उत्सर्जन होणाऱ्या काही घटकांबाबत राणे यांनी चिंता व्यक्त केली. त्यामुळे खंडपीठाने त्यांना याविषयी महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवण्यास सांगून या प्रशासनांकडून चार आठवड्यांनी माहिती मागितली.
Maharashtra TimesEknath Shinde : सध्या व्हॅकेन्सी आहे का? मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांचा मिश्किल सवाल
न्यायालय म्हणाले…
-इंदूरला सलग आठव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळाला. हे तेथील महापालिका अधिकाऱ्यांच्या बांधीलकीमुळे शक्य झाले
-मुंबईत असे का होऊ शकत नाही? मुंबई महापालिकेकडे प्रचंड साधनसामग्री आहे
-इच्छाशक्ती असेल तर हे साध्य करणे कठीण नाही
-घनकचरा व्यवस्थापन नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी सततचे प्रयत्न आवश्यक आहेत
-नागरिकांनाही सामाजिक भान नाही. कारण रस्त्यांवर आणि प्रवासादरम्यानही बिनदिक्कतपणे सार्वजनिक ठिकाणांवर कचरा टाकला जातो
-यामुळेच पावसाळ्यात रस्ते तुंबण्याचे प्रकार होता
-त्यामुळे व्यापक जनजागृतीसह दंडात्मक कारवाईची पावले उचलणे आवश्यक आहे
-महापालिका आयुक्तांनी प्रत्येक प्रभाग अधिकाऱ्यांना आपापल्या भागांत नियमितपणे लक्ष ठेवून कचरामुक्त रस्ते व स्वच्छतेसाठी उपाय योजण्याचे तसेच त्याविषयीचे अहवाल महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश द्यावेत

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा