Headlines

Mumbai Navy sailor Wife 2 children found dead at Colaba Navy Nagar home Crime News; मुंबईत नौदलाच्या जवानाने कुटुंबासह आयुष्य संपवलं, पत्नी आणि चिमुरड्यांचा जेवणातून जीव घेतला, स्वातंत्र्यदिनी खळबळ


Mumbai Navy sailor ends life : मुंबईतील नेव्ही नगर येथील राहत्या घरी नौदलातील जवान, त्याची पत्नी आणि त्यांची दोन मुले यांचं शव आढळल्याने खळबळ उडाली.

Mumbai Colaba Navy Nagar Sailor Death Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : नौदलाच्या जवानाने सहकुटुंब आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण मुंबईतील कुलाबा भागात असलेल्या नेव्ही नगर परिसरात राहणाऱ्या नौदलाच्या जवानाने टोकाचे पाऊल उचलले. संबंधित जवान गळफास लावलेल्या स्थितीत राहत्या घरात आढळला तर पत्नी आणि दोन मुलेही मृतावस्थेत आढळली. पत्नी आणि मुलांना जेवणातून विष देऊन जवानाने जीव दिल्याचे म्हटले जात आहे. त्यांचा मोठा मुलगा ३ वर्षांचा, तर धाकटा अवघ्या दोन महिन्यांचा होता. शनिवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ऐन स्वातंत्र्य दिनी दुर्दैवी घटना

मुंबईतील नेव्ही नगर येथील राहत्या घरी नौदलातील जवान, त्याची पत्नी आणि त्यांची दोन मुले मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरात असलेल्या नौदलाच्या जवानांची वसाहत असलेल्या नेव्ही नगरमध्ये ऐन स्वातंत्र्य दिनी म्हणजे शनिवारी १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास सुरु केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, जवानाने पत्नी आणि मुलांचा जीव घेतल्यानंतर गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली असावी, असा प्राथमिक संशय आहे.

Maharashtra TimesTukaram Mundhe : हे मुंढे कोण आहेत? रिझर्व्हेशन लिस्टमध्ये नाव पाहताच रेस्टॉरंट चालक चपापले, मित्राचा फोन, तुकाराम मुंढेंच्या मुलाचा भन्नाट किस्सा

कुटुंबाला विष देऊन आयुष्य संपवलं

प्राथमिक निष्कर्षांवरुन असे दिसून येते की, पत्नी आणि दोन्ही मुलांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला असावा. त्यामुळे कुटुंबाला जेवणातून विष देऊन नंतर जवानाने जीव दिल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक तपासणीचे अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या मोठ्या अपत्याचे वय ३ वर्षे होते, तर धाकटे बाळ अवघ्या दोन महिन्यांचे होते.

नौदलाचे स्टेटमेंट

कुलाबा येथील नेव्ही नगरमध्ये १५ ऑगस्ट रोजी एका दुर्दैवी घटनेत भारतीय नौदलातील एक खलाशी आणि त्यांची पत्नी व दोन मुले त्यांच्या निवासस्थानी मृत अवस्थेत आढळले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, भारतीय नौदल त्यांना सर्वतोपरी सहकार्य करत आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून सर्व संभाव्य पैलूंची पडताळणी केली जात आहे. चौघांच्या बॉडी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्या आहेत आणि घटनास्थळावरुन फॉरेन्सिक पुरावे गोळा केले जात आहेत.

Maharashtra TimesTukaram Mundhe : अजय, शाहरुख, टायगरला तुकाराम मुंढेंचा दणका, ‘विमल इलायची’च्या जाहिरातीबाबत कारणे दाखवा नोटीसमृत्यूला कारणीभूत ठरलेला घटनाक्रम समजून घेण्यासाठी तपास अधिकारी कुटुंबीय, शेजारी आणि इतर संबंधित साक्षीदारांचे जबाब नोंदवत आहेत. संशयास्पद सामूहिक मृत्यू प्रकरणाला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचा अद्याप उलगडा झालेला नाही. पोलिसांनी सांगितले की तपास सुरु असून पुढील तपशीलांची प्रतीक्षा आहे.