Mumbai Municipal Corporation Warning BMC Employee and Officers Refusing Promotion; वारंवार बढती नाकारून त्याच विभागांना चिकटलेल्या कर्मचाऱ्यांना बीएमसीचा दणका; आता कारवाई होणार म्हणजे होणार!
Mumbai Municipal Corporation Warning BMC Employee and Officers Refusing Promotion; वारंवार बढती नाकारून त्याच विभागांना चिकटलेल्या कर्मचाऱ्यांना बीएमसीचा दणका; आता कारवाई होणार म्हणजे होणार!
BMC Employee Promotion News : पदोन्नतीचा आदेश मिळाल्यानंतर संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला 15 दिवसांच्या आत नवीन पदाचा कार्यभार स्वीकारावा लागणार आहे.
मुंबई महापालिका अधिकारी पदोन्नती कारवाई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्यानंतरही ते पद स्वीकारत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. याची दखल घेत महापालिका प्रशासनाने पदोन्नतीबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. यानुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याने विशिष्ट विभाग, कार्यालय किंवा पदावरील बदली टाळण्याच्या उद्देशाने पदोन्नती नाकारल्याचं आढळल्यास, विभागीय पदोन्नती समितीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या विभागात किंवा कार्यालयात बदली केली जाईल.
जर पदोन्नती नाकारली, तर…
अलीकडेच दोन कार्यकारी अभियंत्यांनी आणि आठ सहायक अभियंत्यांनी अनुक्रमे उपमुख्य अभियंता आणि कार्यकारी अभियंता पदांवरील पदोन्नती नाकारली होती. त्यानंतर बीएमसीमधील विरोधी नेत्यांनी त्यांच्या या निर्णयाची चौकशी करण्याची मागणी केली होती. चौकशीच्या मागणीनंतर, महापालिका प्रशासनाने सोमवारी 29 जून रोजी कर्मचाऱ्यांनी पदोन्नती नाकारण्यासंबंधीच्या आपल्या 1992 च्या परिपत्रकात सुधारणा करणारा आदेश जारी केला.
15 दिवसांच्या आत पदभार स्वीकारावा लागेल
सुधारित परिपत्रकानुसार, पदोन्नतीचा आदेश संबंधित कर्मचाऱ्याला लेखी स्वरूपात तसेच त्याच्या अधिकृत ईमेलवर पाठवला जाईल. पदोन्नतीचा आदेश स्वीकारल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत कर्मचाऱ्याला नवीन पदाचा कार्यभार स्वीकारावा लागेल. विभागप्रमुखांना कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त सात दिवसांच्या आत कार्यमुक्त करणे बंधनकारक असेल. जरी विभागप्रमुखांनी कार्यमुक्तीचा आदेश जारी केला नाही, तरीही कर्मचाऱ्याने मुदतीनुसार त्याची वाट न पाहता नवीन पदावर रुजू झाले पाहिजे. जर संबंधित कर्मचाऱ्याने पदोन्नती आदेश स्वीकारल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत नवीन पदाचा कार्यभार स्वीकारला नाही, तर त्याने पदोन्नती नाकारली आहे, असं मानलं जाईल.
कथित स्वार्थापोटी आपले पदे कायम
पदोन्नती नाकारण्यामागील परिस्थितीची चौकशी करण्याची मागणी करणारे काँग्रेस गट नेते अश्रफ आझमी म्हणाले की, ‘सुधारित परिपत्रक हे पालिका आयुक्तांचे एक सकारात्मक पाऊल असून त्यामुळे सर्व अभियंत्यांना समान संधी मिळेल’. आझमी यांनी मागणी केली की, ‘कथित स्वार्थापोटी पदोन्नती मिळूनही आपली पदे कायम ठेवलेल्या अभियंत्यांना प्रशासनाने त्या पदांवर कायम राहू देऊ नये’.
पालिकेनं काढलेल्या परिपत्रकात असंही म्हटले आहे की, ‘जो कर्मचारी पदोन्नती नाकारेल तो दोन वर्षांच्या कालावधीसाठी पदोन्नतीसाठी अपात्र ठरेल आणि त्या कालावधीत तो ज्येष्ठतेसाठी पात्र राहणार नाही. अपात्रतेच्या कालावधीत पदोन्नती मिळालेला कनिष्ठ कर्मचारी, पदोन्नती नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यापेक्षा ज्येष्ठ मानला जाईल. याव्यतिरिक्त, पदोन्नती नाकारल्यामुळे दोन वर्षांच्या कालावधीसाठी पदोन्नतीसाठी अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्याचा पदोन्नतीचा दावा, प्रचलित नियम आणि विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशीच्या अधीन राहून, कर्मचाऱ्याने लेखी विनंती सादर केल्याशिवाय आपोआप पुनर्संचयित केला जाणार नाही’.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा