Headlines

Mumbai Man robbed by Group of men while on Date in Deonar Crime News; मुंबईतील निर्जन जागी समलिंगी डेट, अचानक टोळकं आलं, कपडे उतरवून व्हिडिओ काढले, 31 वर्षीय तरुणाची लूट


Mumbai Man robbed in Deonar : पीडित तरुण एका समलिंगी डेटिंग ॲपवर ओळख झालेल्या युवकाला भेटण्यासाठी निर्जन स्थळी गेला होता, त्यावेळी टोळक्याने धाक दाखवून त्याला कपडे काढायला लावले. त्याचे व्हिडिओ शूट करुन पैसे घेऊन पोबारा केला.

Deonar Date Man Loot Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : डेटिंग ॲपवर ओळख झालेल्या युवकाला भेटायला गेला असताना एका खाजगी कंपनीत प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून काम करणाऱ्या ३१ वर्षीय तरुणाला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील देवनार भागात ३० जुलै रोजी ही घटना घडली. पीडित तरुणाला या टोळीने आधी कपडे काढायला भाग पाडले, मारहाण केली, धमकावले आणि ५० हजार रुपये लुटून पोबारा केला.

संबंधित तरुण एका डेटिंग ॲपवर ओळख झालेल्या तरुणाला भेटण्यासाठी तिथे गेला होता, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्याचं वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलं आहे. त्या तरुणाला भेटायला आलेली व्यक्तीही या गुन्ह्यात सहभागी असावी, असा संशय तपास अधिकाऱ्यांना आहे.

समलिंगी डेटिंग अॅपवर ओळख

देवनार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून काम करतो. तो शिवाजी नगर येथील रहिवासी असून त्याचे कार्यालय वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स(बीकेसी) येथे आहे. ३० जुलै रोजी एका डेटिंग ॲपवर त्याची एका व्यक्तीशी ओळख झाली; दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले आणि काही काळ चॅटिंग केल्यानंतर देवनारमधील एका निर्जन ठिकाणी भेटण्याचे ठरवले.

Maharashtra TimesFaridabad Teacher Murder : माजी विद्यार्थ्याची घाणेरडी मागणी, सरस्वती स्कूलच्या शिक्षिकेचा नकार, टीचरच्या खुनामागील रहस्याचा उलगडा; दोन मुलांच्या डोळ्यांना आईचा शोध

टोळक्याने चाकूच्या धाकाने लुटलं

समलिंगी अॅपवर भेटलेल्या तरुणासोबत असतानाच काही अज्ञात व्यक्ती तिथे आल्या. त्यांनी तरुणाला चाकूचा धाक दाखवला आणि कपडे काढण्यास सांगितले. त्याने कपडे काढल्यानंतर आरोपींनी त्याला मारहाण केली, त्याचे फोटो व व्हिडिओ काढले आणि पैसे न दिल्यास अंमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली.” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ऑनलाइन बँक ट्रान्सफरद्वारे तरुणाकडून ५० हजार रुपये उकळल्यानंतरच आरोपी तिथून निघून गेले, असेही पोलिसांनी सांगितले.

प्रोजेक्ट कोऑर्डिनेटरच्या तक्रारीवरुन आरोपींविरुद्ध ‘भारतीय न्याय संहिता, २०२३’ च्या कलम ११५ (दुखापत करणे), १२७ (बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे), ३०९ (लूट), ३११ (मृत्यू किंवा गंभीर दुखापत घडवून आणण्याच्या प्रयत्नासह केलेली लूट किंवा दरोडा) आणि ३५१ (गुन्हेगारी स्वरुपाची धमकी) तसेच ‘माहिती तंत्रज्ञान कायद्या’च्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra TimesVikhroli Crime : मोठ्या आवाजात गाणी लावण्यावरुन वाद, विक्रोळीत सख्ख्या भावाचा दादाच्या कुटुंबावर हल्ला, बापलेकाचा मृत्यू, आई-धाकटा लेक जखमी

डेटिंगला भेटलेला तरुणही सहभागी असण्याची शक्यता

“प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, तक्रारदारासोबत भेटायला आलेली व्यक्तीही या गुन्ह्यात सहभागी होती. ही व्यक्ती आणि इतर आरोपी डेटिंग ॲप्सवर पुरुषांशी मैत्री करायचे आणि त्यांना डेटसाठी बोलावून धमकावणे, मारहाण करणे व लुटणे असे प्रकार करायचे. समलिंगी म्हणून ओळख उघड होईल या भीतीपोटी पीडित व्यक्ती पोलिसांकडे तक्रार करणार नाही, अशी त्यांना अपेक्षा असायची, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा