Crorepati Stock Returns: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने केवळ पाच वर्षांत 100,000 रुपये गुंतवलेल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले. गुरुवारी, या शेअरने 52 आठवड्यांचा नवीन उच्चांक गाठला, तर शुक्रवार, आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी, या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये किंचित चढ-उतारपाहायला मिळत आहे.

पाच वर्षांत 10000% पेक्षा जास्त परतावा
या छुटकू स्टॉकच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, पाच वर्षांपूर्वी म्हणजे 6 ऑगस्ट 2021 रोजी या शेअरचा भाव फक्त 2.41 रुपये होता. तर शुक्रवार, आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी, 262.80 रुपयांना क्लोज झाली. अशाप्रकारे, गेल्या पाच वर्षांत या शेअरने 10,810.37 टक्क्यांची शानदार वाढ नोंदवली आणि गुंतवणूकदारांचा खिसा भरला.
Income Tax Rule: पतीच्या मालकीचे घर खरेदी करून 7 कोटींचा कर वाचवणाऱ्या महिलेला अखेर कोर्टाकडून दिलासा, प्रत्येकासाठी धडा आहे हा खटलाक्यूपिड लिमिटेड कंडोम, पर्सनल केअरची उत्पादने आणि मेडिकल डायग्नोस्टिक किट्सचे उत्पादन करते व जगभरातील 100 हून अधिक देशांमध्ये उत्पादने निर्यात केली जातात. अशाप्रकारे कंपनीच्या स्टॉक रिटर्न्सच्या आधारावर गुंतवणूकदारांनी कमावलेल्या नफ्याचे कॅलक्युलेशन केल्यास 2 रुपयांचा हा स्टॉक स्टॉक इतक्या कमी वेळात करोडपती स्टॉक कसा बनला हे दिसून येते.
त्याचवेळी, पाच वर्षांपूर्वी म्हणजे 6 ऑगस्ट 2021 रोजी 2.41 रुपयांना क्युपिड स्टॉकमध्ये एखाद्याने फक्त एक लाखांची गुंतवणूक केली असेल आणि अजूनही शेअर्स होल्ड करून ठेवले असतील तर, आता या गुंतवणुकीवर 10,779% इतक्या मल्टीबॅगर रिटर्न्ससह 1.87 कोटी रुपये झाले असेल.
एका वर्षात सातपट परतावा
दुसरीकडे, केवळ दीर्घकाळातच नव्हे तर क्युपिड लिमिटेड या स्टॉकने एका वर्षातही गुंतवणूकदारांना भरभरून परतावा दिला. गेल्या एका वर्षातही या छोट्या स्टॉकने गुंतवणूकदारांना सात पटींपेक्षा जास्त परतावा दिला असून या काळात क्युपिड शेअरने 682% झेप घेतली. तसेच सहा महिन्यांत 210% दमदार परतावा दिला तर, गेल्या पाच ट्रेडिंग दिवसांत स्टॉकची किंमत जवळपास 13.17% वाढली आहे.
RBI New Rules: EMI न भरल्यास बँक मोबाईल-लॅपटॉप लॉक नाही करू शकणार; कर्जदारांना RBI चा मोठा दिलासा, लोन रिकव्हरीच्या दादागिरीला लगामयाशिवाय स्टॉकच्या या मल्टीबॅगर कामगिरीचा परिणाम थेट कंपनीच्या बाजार मूल्यावर झाला क्युपिडचे बाजार भांडवल आता 34,350 कोटींवर पोहोचले आहे. या मल्टीबॅगर स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 267 रुपये आहे.

