‘साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट’च्या अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र’, मुंबई यांच्यातर्फे 2007 सालापासून दर वर्षी मराठीतील उत्कृष्ट अनुवादित ग्रंथास ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येते. कवि
.

तज्ञ परीक्षकांतर्फे मराठीतील मागील दोन वर्षांत प्रकाशित झालेल्या अनुवादित ग्रंथांचा सखोल आढावा घेऊन या पुरस्काराकरिता ग्रंथाची निवड केली जाते, त्यानुसार या वर्षी हा पुरस्कार खालील दोन पुस्तकांना जाहीर करण्यात येत आहे.

या दोन पुस्तकांना मिळाला पुरस्कार
‘पाळंमुळं’ – मूळ जर्मन लेखक : साशा स्टानिसिच जर्मन भाषेतून मराठी अनुवाद : जयश्री हरि जोशी, (प्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे,2025) ‘त्सुबाकी स्टेशनर्स’ – मूळ जपानी लेखक : इतो ओगावा जपानी भाषेतून मराठी अनुवाद : मयुरेश कुलकर्णी, (प्रकाशक : कलासक्त, पुणे,2025)
आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राचे अध्यक्ष प्रफुल्ल शिलेदार म्हणाले, या पुरस्कारासाठी तज्ञ परीक्षक म्हणून निखिलेश चित्रे (अध्यक्ष), करुणा गोखले आणि गणेश मतकरी यांनी काम पाहिले. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असे असून एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार जयश्री हरि जोशी आणि मयुरेश कुलकर्णी या दोन अनुवादकांना दिला जाईल.
