Headlines

खवड्या डोंगरावरुन जीव गमावणाऱ्या संगीता चांदगुडे यांचा व्हिडीओ व्हायरल, प्रेम आणि नात्याबद्दल भावनिक भाष्य


छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे संपूर्ण देश सुन्न झाला आहे. रागात जीवन संपवणाऱ्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी आटापीटा करणाऱ्या आई-वडिलांचादेखील या मुलासोबत जीव गेला. या घटनेनंतर मुलाची आई संगीता चांदगुडे हिचे मृत्यूपूर्वीचे सोशल मीडियावरचे काही व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. अशाच व्हिडीओंपैकी एका व्हिडीओत संगीता या प्रेम आणि नात्याबद्दल अत्यंत भावनिक भाष्य करताना दिसत आहेत.

Sangita Chandgude
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : तिसगाव शिवाऱ्यातील खवड्या डोंगरावर शुक्रवारी (23 ऑगस्ट) प्रचंड नाट्यमय घडामोडी घडताना बघायला मिळालं. एक 19 वर्षीय तरुण स्वत:ला संपवून घेण्याचा प्रयत्नात होता. त्याला तिथे उपस्थित असलेल्या पर्यटकांनी, त्याच्या आई-वडिलांनी, स्थानिक सरपंचांनी, पोलीस, अग्निशामक दलाच्या जवानांनी या तरुणाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण तरुण ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. जवळपास तीन तास हे सर्व नाट्य सुरु होतं. कुणाल चांदगुडे असं या तरुणाचं नाव होतं.

कुणालचा आत्महत्येचा विचार थोडासा मावळला असं वाटत असतानाच त्याचे वडील त्याच्याजवळ गेले. त्यांनी त्याला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला. पण दोघांचा तोल गेल्याने ते खोल दरीत कोसळले. दोघांना दरीत कोसळत असल्याचं पाहून कुणालची आई संगीता चांदगुडे यांनीदेखील स्वत:ला दरीत झोकून दिलं. या घटनेत तीनही जणांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला. कुटुंबातील वादामुळे ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून या प्रकरणी सविस्तर तपास केला जातोय.

या घटनेतील मृतक मुलाचे नाव कुणाल चांदगुडे असं आहे. तर त्याच्या पित्याचे मुरलीधर चांदगुडे असं नाव आहे. तर आईचं नाव संगीता चांदगुडे असं आहे. या घटनेनंतर संगीता चांदगुडे या रिल्सस्टार आणि युट्यूबर असल्याची माहिती समोर आली आहे. संगीता यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ त्या प्रेम आणि नात्याबद्दल बोलत असल्याचं दिसत आहे.

संगीता चांदगुडे व्हायरल व्हिडीओत काय बोलताना दिसल्या?

“ताटातलं नाही तर आपल्या नशिबातलंदेखील देण्याची तयारी ठेवा. पण अशा व्यक्तीला ज्याला आपली किंमत असेल, आपल्या प्रेमाची किंमत असेल, जर एखादी व्यक्ती आपली किंमत करत नसेल, आपल्या प्रेमाची किंमत करत नसेल, आपण त्याच्यासाठी जे करतो, त्याची किंमत नसेल, तर अशा व्यक्तीसाठी काहीही करण्यात काहीच अर्थ नाही”, असं भावनिक मत संगीता चांदगुडे मांडताना दिसत आहेत.

“पोळी देखील तेव्हाच गोड लागते जेव्हा ती दोन्ही बाजूने भाजली जाते. केवळ एका बाजूने भाजली तर तिला आपण खाऊ शकत नाही. तसंच नात्यांचंदेखील आहे. जर ते दोन्ही साईडने चालत असेल, दोघेही नात्याची किंमत करत असतील, तर अशा नात्यामध्ये राहा. नाहीतर एकाने प्रेम करायचं आणि दुसऱ्याने त्याची किंमतच करायची नाही, मग अशा नात्याला काहीच अर्थ नाही. अशा नात्यांमधून तुम्ही बाहेर पडलेलं केव्हाही बरं”, असं मत संगीता या व्हिडीओत मांडताना दिसल्या आहेत.

संगीता यांचे व्हिडीओ पाहता त्यांच्या मनात नात्याबद्दल आणि भावनांचा काहूर माजलेला होता, असं जाणवत आहे. त्यांच्या कुटुंबात नेमका काय वाद होता? ते आता पोलीस तपासातून समोर येईलच. पण एका कुटुंबाचा अशाप्रकारे अंत झाल्याने संपूर्ण देशभरात या घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा