Headlines

Most Expensive Divorce Settlement; करोडों नव्हे तर अब्जोंमध्ये तुटली नाती; सेटलमेंटसाठी द्यावी लागलेली लाखो कोटींची पोटगी, Billionaires चे महागडे घटस्फोट माहित्येय का?

Most Expensive Divorces: अब्जाधीश व्यक्तींच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या हालचालींकडे, विशेषतः त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास लोकांना खूप रस असतो. सेलिब्रिटी, अब्जाधीशांमध्ये घटस्फोट एक सामान्य बाब बनली असून कोणी 40 वर्षांनी घटस्फोट घेतला, तर कुणी 15-20 वर्षांनी एकमेकांपासून विभक्त झाले.

Billionaire's Most Expensive Divorces in the World 2026 List
जगातील सर्वात महागडे घटस्फोट
World Richest Divorces: अब्जावधींच्या संपत्तीचे मालक असलेल्या व्यक्तिमत्त्वांच्या घटस्फोटाने लोकांना विशेषतः धक्का बसतो. पण घटस्फोटानंतर पोटगीबद्दल जास्त चर्चा रंगते आणि पोटगीची रक्कमही तितकीच जास्त असते, जी कधीकधी अब्जावधी रुपयांची असते. अब्जाधीश उद्योगपतींपैकी सर्वात महागड्या घटस्फोटांबद्दल जाणून घेऊया.

जगातील महागडा घटस्फोट कोणाचा?

जगातील महागडा घटस्फोट कोणाचा?

बिल गेट्स आणि मेलिंडा फ्रेंच गेट्स यांच्यात जगातील सर्वात महागडा घटस्फोट अग्रीमेंट झाला. गेट्स दाम्पत्य लग्नाच्या तब्बल 27 वर्षांनंतर 2021 मध्ये झाला असून बिल गेट्स यांनी पत्नीला तब्बल अंदाजे 76 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 6.3 लाख कोटी रुपयांची पोटगी दिली.

जेफ बेझोस आणि मॅकेन्झी स्कॉट

जेफ बेझोस आणि मॅकेन्झी स्कॉट

गेल्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकलेले ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस 2019 मध्ये पहिली पत्नी मॅकेन्झी बेझोस यांचा घटस्फोट झाला. जेफ बेझोस यांना घटस्फोटात एक्स-पत्नीला पोटगी म्हणून 2.75 लाख कोटी रुपये द्यावे लागलेले. यानंतर मॅकेन्झी जगातील 22 व्या सर्वात श्रीमंत बनलेल्या. लग्नाच्या 25 वर्षांनी 2019 स्कॉट आणि जेफ बेझोस विभक्त झाले. या घटस्फोटाची जगभरात मोठ्या प्रमाणावर चर्चा झालेली.

रूपर्ट आणि ॲना मर्डोक

रूपर्ट आणि ॲना मर्डोक

अमेरिकेतील मीडिया क्षेत्रातील दिग्गज रूपर्ट मर्डोक आणि त्यांची दुसरी पत्नी ॲना मर्डोक यांचा घटस्फोट अंदाजे 1.7 अब्ज डॉलर्स आणि सुमारे 110 दशलक्ष डॉलर्सच्या रोख रकमेच्या पोटगीसह पूर्ण झाला.

हार्वे विन्स्टिनचा घटस्फोट

हार्वे विन्स्टिनचा घटस्फोट

हॉलीवूडचा चित्रपट सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हार्वे विन्स्टिनचा घटस्फोट चर्चेत राहिला. 2017 मध्ये अभिनेत्री आणि महिला कलाकारांनी मीडिया सम्राटावर लैंगिक छळाचे आरोप केले, ज्यामुळे #MeToo चळवळीला सुरुवात झाली. त्यानंतर फॅशन डिझायनर जॉर्जिया चॅपमनने हार्वे विन्स्टिनपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. अंदाजे 15-20 दशलक्ष डॉलर्स, म्हणजेच 1.64 अब्ज रुपयांपेक्षा जास्त सेटलमेंटमध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

अलेक वाइल्डनस्टाईन आणि जॉसेलिन वाइल्डनस्टाईन

अलेक वाइल्डनस्टाईन आणि जॉसेलिन वाइल्डनस्टाईन

1999 मध्ये फ्रेंच-अमेरिकन व्यावसायिक आणि कला व्यापारी ॲलेकने दोन वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर आपल्या पत्नीला 3.8 अब्ज डॉलर्सची पोटगी दिली.

भारतातील सर्वात महागडा घटस्फोट (संभाव्य)

भारतातील सर्वात महागडा घटस्फोट (संभाव्य)

भारतीय श्रीमंतांबद्दल बोलायचे तर Zoho चे सह-संस्थापक श्रीधर वेंबू आणि प्रमिला श्रीनिवास यांच्यात घटस्फोटाचा खटला सुरू आहे. याआधी कॅलिफोर्निया कोर्टाने त्यांना पत्नी प्रमिलाला 15000 कोटींचा बॉन्ड जमा करण्याचा आदेश दिला होता. पण अंतिम निकाल असाच लागला, तर श्रीधर वेंबूंचा घटस्फोट भारतीय इतिहासातील सर्वात महागडा ठरू शकतो.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा