NIFTI मध्ये अचानक इतका मोठा बदल होण्याचे कारण काय?
निफ्टीने आज शेअर बाजार बंद होण्याअगोदरच्या काही क्षणांआधी कमाल केली आहे. निर्देशांक थेट 200 अंकांनी वाढला आहे. सहसा शेवटच्या वेळी निर्देशांकात इतकी मोठी वाढ दिसत नाही. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांच्या डोक्यात प्रश्नांचे वादळ सुटले आहे. या बदलामागील कारण म्हणजे SEBI ने आणलेला नवीन नियम. SEBI ने क्लोजिंग ऑक्शन सेक्शन (CAS) लागू केला आहे.
CAS या नव्या नियमामुळे आज NIFTY शेअर बाजार बंद होण्याच्या अवघ्या काही क्षणाआधीच थेट 200 अंकांनी वाढला होता. अनेक तज्ज्ञांद्वारे सांगण्यात आले आहे की SEBI च्या नव्या नियमामुळे या गोष्टी पुढेही घडत राहणार आहेत. शेअर बाजार बंद होण्याआधी निर्देशांकांत मोठा चढउतार दिसून येऊ शकतो. काही दिवस मोठे चढउतार पाहून अनेक गुंतवणूकदारांना नक्कीच प्रश्न पडतील तसेच गोंधळ उडेल पण काही दिवसांनी त्यांना या सगळ्याची सवय होईल.
क्लोजिंग ऑक्शन सेक्शन (CAS) या नियमाचा नेमका अर्थ काय?
क्लोजिंग ऑक्शन सेक्शन (CAS) म्हणजे जेव्हा शेअर बाजार बंद होण्याच्या क्षणात असतो, त्यावेळी एखादा शेअर ज्या जास्तीत जास्त किमतीने विकला किंवा खरेदी केला जातो, ती किंमत त्या शेअरची क्लोजिंग प्राईज ठरते. या पद्धतीमुळे क्लोजिंग प्राईज अधिक पारदर्शक होते. तसेच मोठ्या संस्थांना योग्य किंमतीत व्यवहार करता येतो.
PFF Savings Rules : गुंतवणुकीसाठी उत्तम, पण चुका टाळा; परताव्यात अडचणी नको तर या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाआधी अशी पद्धत वापरली जात होती
जुन्या पद्धतीत शेअर बाजार बंद होताना विक्री आणि खरेदी किंमतीची सरासरी काढली जात होती. ती सरासरी किंमत त्या शेअर्सची क्लोजिंग प्राईज ठरली जात होती. फ्युचर अँड ऑप्शन्स व्यतिरिक्त इतर ट्रेडिंग पद्धतीसाठी अजूनही जुनीच पद्धत वापरात आहे. CAS या पद्धतीचा वापर तुर्तास फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडींगसाठी केला जात आहे

