व्यवसाय क्षेत्रात उतरायचे स्वप्न पाहत आहात तर एक गोष्ट लक्षात ठेवा, या क्षेत्रात प्रत्येक व्यवसायाला कधी ना कधी अपयशाच्या मार्गातून जावेच लागते. अशा वेळी स्वतःला सावरून ठेवणारा व्यावसायिकच व्यवसाय क्षेत्रात आपले व्यवसाय टिकवून ठेवण्यात यशस्वी होतो. अशा व्यावसायिकांच्या यादीत सुवर्णाक्षरात आपले नाव कोरणारी व्यावसायिक म्हणजे सिंगापूरची मिजा नाझिली!

अपयश ही यशाची पहिली पायरी असते, पण जेव्हा नशीबात सतत अपयश येत राहते तेव्हा माणसाची जिद्द तुटते. पण मिजा नाझिली यांनी तसे कधीच होऊन दिले नाही. व्यवसाय क्षेत्रात येताच मिजा नाझिली यांना तीन वेळा अपयश मिळाले. त्यांचे तिन्ही व्यवसाय बाजारात टिकले नाही. त्या तीन व्यवसायांच्या तोट्याचा परिणाम इतका तीव्र होता की मिजा नाझिली यांच्यावर 76 लाखांचे कर्ज चढले. त्या काळात मिजा नाझिली यांची आर्थिक परिस्थितिही फार बेताची झाली होती. डोक्यावर इतके मोठे कर्ज होते, त्यात बँकेत फक्त 1,900 रुपये रक्कम जमा होती. अशात तिन्ही व्यवसायांपैकी एकही व्यवसाय चालत नव्हता. त्यांचा व्यवसाय पूर्णपणे अडचणीत होता.
अशा परिस्थित हार पत्करण्यापेक्षा मिजा नाझिली यांनी लढणे स्वीकारले. बाजारातून माल वाहण्याचा खर्च वाचवण्यासाठी त्या स्वतः सिंगापूर ते मलेशिया प्रवास करू लागल्या आणि माल आणू लागल्या. त्यांनी हेल्थ अँड वेलनेस क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले. सुरुवातीला त्यांच्या प्रोडक्ट्समध्ये रिटेल व्यावसिकांनी फार काही रस दाखवला नाही पण मिजा नाझिली यांनी जिद्द काही सोडली नाही. त्या प्रयत्न करत राहिल्या, बाजारात त्यांच्या मालाला मागणी वाढली. उशिरा का होईना पण लोकांनी त्यांना स्वीकारलं.
आजच्या घडीला मिजा नाझिली सिंगापूर येथील हेल्थ अँड वेलनेस क्षेत्रातील मोठे नाव आहे. आज त्यांचे प्रोडक्ट्स 100 पेक्षा जास्त आऊटलेटमध्ये उपलब्ध आहेत. मिजा नाझिली यांचे एकूण 5 ब्रॅंडस आहेत आणि त्या स्वतः त्यांच्या कंपनीच्या सीईओ आहेत. नुकतीच त्यांनी Porsche कार खरेदी केली आहे. त्यांच्या व्यवसायाचे नेटवर्थ 143 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
1947 मध्ये डॉलरची किंमत होती 3 रुपये 30 पैसे, 80 वर्षांत 95 चा आकडा कसा पार केला? इतिहास अन् गणित समजून घ्यामिजा नाझिली यांनी त्यांच्या संघर्षातून दाखवून दिले आहे की वेळ प्रत्येकाची येते, फक्त आपण कधीही हार पत्करायची नाही. जर आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवले आणि होणाऱ्या अपयशाचा परिणाम आपल्या कष्टावर आणि जिद्दीवर किंचितभरही होऊन दिला नाही तर आपल्याला यशाचे शिखर गाठण्यापासून कुणीही अडवू शकत नाही.

