Headlines

Mira Bhayandar Married Woman Asmita Mishra ends life over dowry High Court orders CBI enquiry Crime News; विवाहितेने आयुष्य संपवलं, अस्मिताच्या वडिलांचे गंभीर आरोप, पोलिसांचा तपास संशयास्पद, हायकोर्टाचा मोठा निर्णय


Mira Bhayandar Crime News : अस्मिताचं लग्न नोव्हेंबर २०२१ मध्ये झालं. रीतीरिवाजाप्रमाणे मे २०२२ पासून ती पती आणि सासरच्यांसोबत राहू लागली. त्यानंतर तिचा हुंड्यासाठी छळ सुरु झाला

Asmita Mishra Death Kashimira Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मिरा रोड : सुमारे तीन वर्षांपूर्वी हुंड्याची मागणी व छळवणुकीमुळे महिलेचा मृत्यू झाल्याच्या आरोप प्रकरणात काशीमिरा पोलिसांचा तपास संशयास्पद असल्याचे ताशेरे ओढत, मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सीबीआयला तपास करण्याचा आदेश दिला आहे.

हुंडाबळी गेल्याची तक्रार

पीडित अस्मिताचे वडील अमर मिश्रा यांनी फेब्रुवारी-२०२३ मध्ये ठाण्यातील काशीमिरा पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता तसेच हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत मुलीच्या पती व सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी प्रथम एफआयआर नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली आणि नंतर तपासातही जाणीवपूर्वक अनेक त्रुटी व विसंगती ठेवल्या, असा आरोप करत मिश्रा यांनी अॅड. घनश्याम उपाध्याय यांच्यामार्फत फौजदारी रिट याचिका केली होती. तसेच सीबीआय तपासाची मागणी केली होती. त्यााविषयीच्या सुनावणीअंती न्या. सारंग कोतवाल न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.
Maharashtra TimesPune Crime : पतीशी प्रेमसंबंधाचा संशय, पत्नीने विवाहित सेक्रेटरीचा जीव घेतला, मग बॉडी ऑफिसमध्येच का ठेवली? पोलीस तपासात कारण समोर

मारहाणीमुळे गर्भपात

याचिकेनुसार, अस्मिताचे लग्न नोव्हेंबर-२०२१ मध्ये झाले आणि रीतीरिवाजाप्रमाणे मे-२०२२ पासून ती पती व सासरच्यांसोबत राहू लागली. त्यानंतर तिचा हुंड्यासाठी छळ सुरू करण्यात आला. तिला वारंवार मारहाण होत असल्याचे आणि तिचा गर्भपातही झाल्याचे तिने वडिलांना सांगितले होते. २३ फेब्रुवारी २०२३ रोजी तिने जीव दिल्याची माहिती मिश्रा यांना अचानक देण्यात आली. मात्र, त्यांना तिच्या शरीरावर जखमांचे अनेक व्रण आढळले. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास प्रथम टाळाटाळ केली आणि नंतर एफआयआर दाखल केला असला तरी, आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला नाही.

Solapur | सोलापूर महापालिकेत पाणी योजनेवरून गोंधळ, शिंदे-काँग्रेसचे नगरसेवक निलंबित, भाजपची कारवाई

मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

‘ज्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने शवविच्छेदन केले, तिने मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी आपण न्यायसहायक विज्ञानातील तज्ज्ञ नसल्याचे पूर्वी पत्रात म्हटले होते. मात्र, नंतर तिनेच असा अभिप्राय दिला की, मृत्यू लटकण्यामुळे झाला आहे. तसेच शवविच्छेदनाच्या वेळी तो इन-कॅमेरा करावा का, असे तिने विचारले असता, पोलिसांनी तिला नको म्हणून सांगितले होते. त्यामुळे शवविच्छेदन गांभीर्याने झाले नसल्याचे स्पष्ट होते. अनेक गंभीर विसंगती याचिकाकर्त्याने दाखवले असल्याने पोलिसांच्या तपासाबाबत संशय निर्माण होत आहे’, असे खंडपीठाने आपल्या निर्णयात नमूद केले.
Maharashtra TimesAmravati Crime : अयानचा निर्लज्जपणा, पैशांसाठी कुटुंबालाही सोडलं नाही, आईच्या स्त्रीधनालाच हात घातला
‘पोलिसांनी तपासासंबंधीची सर्व कागदपत्रे तत्काळ सीबीआयकडे सुपूर्द करावीत. तसेच सीबीआयने तपास कार्यक्षमतेने आणि आधीच्या तपासाने प्रभावित न होता करावा,’ असे खंडपीठाने स्पष्ट केले.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा