Ratnagiri mlc election shiv sena leader bal mane withdrew his candidacy after meeting nitesh rane set back for uddhav Thackeray; उमेदवाराने शेवटच्या क्षणी दगा दिला, राणेंच्या भेटीनंतर अर्ज मागे; उद्धव ठाकरेंकडूनही एक घाव दोन तुकडे
Ratnagiri mlc election shiv sena leader bal mane withdrew his candidacy after meeting nitesh rane set back for uddhav Thackeray; उमेदवाराने शेवटच्या क्षणी दगा दिला, राणेंच्या भेटीनंतर अर्ज मागे; उद्धव ठाकरेंकडूनही एक घाव दोन तुकडे
प्रसाद रानडे, रत्नागिरी: कोकणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या ट्विस्ट पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांनी भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या भेटीनंतर आपल्या उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महाविकास आघाडीच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या सुकन्या जुईली देवी यांचा उमेदवारी अर्ज शिंदे यांच्या आदेशानंतर मागे घेण्यात आला. महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उपनेते बाळ माने यांचा अर्ज आजपर्यंत कायम होता. मात्र आज नितेश राणे यांच्या भेटीनंतर मोठी राजकीय घडामोडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
माजी आमदार बाळ माने हे पूर्वी भाजपचे नेते राहिले आहेत. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदल्यानंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. उद्धव ठाकरे यांनी विश्वास दाखवत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेची उमेदवारी दिली होती. मात्र आज नितेश राणे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी माघार घेतली. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर बाळ माने यांनी घोडेबाजार टाळण्यासाठी आपण निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरेंकडून तात्काळ निर्णय
बाळ माने यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने दुखावलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माने यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. “बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे,” अशी माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
राणेंकडून ठाकरेंवर कुरघोडी
ऐनवेळी महाविकास आघाडीच्या उमेदवाराने माघार घेतल्याने कोकणात राणेंचाच शब्द चालतो, हा संदेशही देण्यात मंत्री नितेश राणे यशस्वी झाले आहेत. बाळ माने यांच्यासमवेत झालेल्या बैठकीला खासदार सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांच्यासह आदी नेते मंडळी उपस्थित होती.
दरम्यान, बाळ माने यांच्या माघारीनंतर आता ठाकरे गटाकडून किंवा महाविकास आघाडीकडून नेमकी काय प्रतिक्रिया दिली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा