Meloni vs Trump: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ट्रम्प यांचे दावे फेटाळून लावताना मेलोनी यांनी ‘मी आणि इटली कधीही भीक मागत नाही’, असं विधान केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
रोम: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चांगलंच सुनावलं आहे. डोनाल्ड ट्रम्प कपोलकल्पित कहाण्या रचत असल्याचा आरोप त्यांनी केला. G7 देशांच्या परिषदेत मेलोनी माझ्याकडे फोटो काढण्यासाठी आर्जवं, विनंत्या करत होत्या, असं ट्रम्प यांनी एका इटालियन वाहिनीला सांगितलं होतं. ट्रम्प यांच्या दाव्याबद्दल मेलोनी यांनी आश्चर्य व्यक्त केलं. ट्रम्प यांचे दावे पूर्णपणे चुकीचे आणि बिनबुडाचे असल्याचं मेलोनी यांनी म्हटलं.
ट्रम्प यांच्या दाव्यानंतर मेलोनी सरकारनं नाराजी व्यक्त केली आहे. इटली चे परराष्ट्रमंत्री एंटोनियो तजानी यांनी तर पुढील आठवड्यातील त्यांचा अमेरिका रद्द केला आहे. तशी घोषणाच त्यांच्याकडून करण्यात आली आहे. हा सगळा घटनाक्रम पाहता अमेरिका आणि इटली यांच्यातील संबंध बिघडताना दिसत आहेत. इराण युद्धावरुन दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला होता. पण त्यानंतर दोन्ही देशांनी आपले संबंध सुधारले. आता त्यात पुन्हा एकदा मिठाचा खडा पडला आहे. US Isarel: ट्रम्प तुमचे एकमेव समर्थक! इस्रायलनं आता भानावर यावं! अमेरिकेचा तीव्र संताप; संबंध का बिघडले? फ्रान्समध्ये जी-७ देशांची परिषद संपन्न झाली. या परिषदेतील एक व्हिडीओ समोर आला. त्यात मेलोनी आणि ट्रम्प एका छोट्या सोफ्यावर शेजारी बसून चर्चा करत होते. त्यावर भाष्य करताना ट्रम्प यांनी भलताच दावा केला. मी केवळ त्यांची (मेलोनी) माझ्यासोबत बोलण्याची इच्छा पूर्ण केली होती. मी त्यांच्याशी बोललो म्हणून बहुधा त्या अतिशय आनंदात होत्या. मला त्यांच्याशी बोलण्याची गरज नव्हती, असं ट्रम्प इटालियन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
‘त्यांनी (मेलोनी) यांनी माझ्या सोबत फोटो काढण्याची विनंती केली होती. त्या माझ्या सोबत फोटो काढण्यासाठी अधीर झाल्या होत्या. मी फोटो काढत नाही. पण मला त्यांची दया आली,’ असं ट्रम्प यांनी La7 ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. ट्रम्प यांच्या मुलाखतीचा अनुवाद वाहिनीकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. Giorgia Meloni: मी सिगारेट सोडली! मेलोनींचं उत्तर ऐकून G-7 नेत्यांचा एकच सवाल; सगळे खळखळून हसले ट्रम्प यांच्या दाव्यांना, त्यांनी कथन केलेल्या घटनाक्रमाला मेलोनी यांनी कठोर शब्दांत उत्तर दिलं आहे. ‘डोनाल्ड ट्रम्प कपोलकल्पित कहाण्या सांगत आहेत. त्यांची विधानं ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. अमेरिकेचे अध्यक्ष त्यांच्या साथीदारांबद्दल अशी विधानं का करतात, असं वर्तन का करतात, त्याची कल्पना नाही,’ असं मेलोनी म्हणाल्या. ‘डोनाल्ड ट्रम्प यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी. मी आणि इटली कधीही भीक मागत नाही,’ अशा कठोर शब्दांत मेलोनी यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा