Headlines

Mathadi Workers: भूखंड हस्तांतरणात शर्तभंग; विधानसभेत सरकारची कबुली, माथाडींवरील अन्यायाची होणार चौकशी


मुंबई : कांदिवली (पश्चिम) येथील माथाडी कामगारांसाठी असलेल्या कापड बाजार व दुकान मंडळाच्या २७ एकर भूखंड हस्तांतरण व पुनर्विकास प्रक्रियेत झालेला शर्तभंग शासनाने मान्य केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून, बांधकाम न झालेली २६,९०० चौरस मीटर अतिरिक्त शासकीय जागा संस्थेकडून पुन्हा शासनजमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

शिवसेना आमदार हारुन खान यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार योगेश सागर यांनीही उपप्रश्न करताना या सर्व प्रकरणाची चौकशी करताना येथील माथाडी कामगारांच्या घराचा प्रश्न निकाली काढण्याची मागणीही केली. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, या हस्तांतरण प्रक्रियेत बांधकामाची मुदतवाढ, वाणिज्यिक वापर आणि त्यानंतरच्या हस्तांतरणामध्ये शर्तभंग झाला आहे. हा शर्तभंग नियमित करण्यासाठी आधीच २१.६७ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. मात्र, तरीही लीज डॉक्युमेंट आणि हस्तांतरण प्रक्रियेत काही कायदेशीर त्रुटी राहून गेल्याचे समोर आले आहे.

Maharashtra TimesRTI Act : अण्णा हजारेंमुळे सरकारची धावपळ, मुख्यमंत्र्यांची तातडीची एंट्री; अखेर आरटीआयवर काय घडलं?
खालच्या स्तरावर काही गडबड झाली आहे का, याचा संपूर्ण डेटा ७ ते १५ दिवसांत सरकारकडे येईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. तसेच, विकासकासोबत करारनामा करताना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता २६,९०० चौ. मीटर क्षेत्राचा समावेश करण्यात आल्याने, हा मोठा शर्तभंग ठरवून ती जागा शासकीय ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

माथाडींच्या घरांसंदर्भात सकारात्मक निर्णय
‘येथील २६,९०० चौ. मीटर अतिरिक्त जागा सरसकट ताब्यात न घेता, तिथे माथाडी कामगारांसाठी घरे बांधली जावीत’, अशी मागणी योगेश सागर यांनी केली. यावर, ‘शर्तभंग झाल्यामुळे तूर्तास ही जागा शासनजमा करण्याचे निर्देश दिले असले, तरी माथाडी कामगारांना न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे’, असे महसूलमंत्री म्हणाले.

Maharashtra TimesWomen Farmer Bill: विनासातबाराही शेतकरी प्रमाणपत्र; महिला शेतकरी विधेयकाला विधानसभेत एकमताने मंजुरी, तरतुदी काय?
गृहनिर्माण संस्था ‘फ्री होल्ड’ होणार
ज्या जमिनीवर आधीच घरे बांधून गृहनिर्माण सोसायट्या तयार झाल्या आहेत, तेथे राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना नागरिक आणि कामगारांना पूर्ण संरक्षण दिले जाईल. सरकार त्यांच्या जमिनी ‘फ्री होल्ड’ करून त्यांच्या मना मालकी हक्काच्या करणार आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत