Headlines

Marathi TV Serial in South Africa:’माझ्या नवऱ्याची बायको’ दक्षिण आफ्रिकेतही लोकप्रिय; प्रेक्षकांमध्ये गुरुनाथ सुभेदार, शनाया, राधिकाची प्रचंड क्रेझ


Marathi TV Serial in South Africa:मराठी मालिका या प्रेक्षकांसाठी त्यांच्या जगण्याचा एक भाग होताना दिसतात. मराठी मालिकेचा चाहता वर्ग फक्त महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे तर परदेशातही आहे. गेल्या काही वर्षात मराठी मालिका वेगवेगळ्या देशांतील भाषांमध्ये डब करून प्रसारित केल्या जात आहेत. त्यांनाही मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय.

Marathi TV Serial in South Africa
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई टाइम्स टीम

मराठी मालिका ंचे चाहते सातासमुद्रापार असतात, असं नेहमी म्हटलं जातं. पण हे चाहते केवळ मराठीच नव्हे; वेगळ्या भाषेतलेसुद्धा असतील तर? अनेक मराठी मालिकांच्या बाबतीत हे घडतंय थेट दक्षिण आफ्रिकेत. तिथल्या झुलू या भाषेत आपल्या मराठी मालिका डब करून प्रसारित केल्या जात असून, त्याला तुफान प्रतिसाद मिळतोय. विशेष म्हणजे आफ्रिकी चाहत्यांना भेटण्यासाठी अभिजीत खांडकेकर , अनिता दाते आणि शरयू सोनवणे हे कलाकार तिथे गेले आहेत. दक्षिण आफ्रिकामध्ये सध्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘ अप्पी आमची कलेक्टर ‘, ‘पारू’, ‘ पुन्हा कर्तव्य आहे ‘ या मालिका दाखवल्या जात आहेत. यापूर्वीही तिथे बऱ्याच मराठी मालिका डब करून दाखवल्या गेल्या असून प्रेक्षकांमध्ये त्या लोकप्रिय आहेत.

Maharashtra TimesDevendra Fadnavis on Ramayana: ”रामायणम्’ला ऑस्कर मिळाला नाही तर मी नाराज होईन’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रणबीर कपूरच्या सिनेमाचे कौतुक
अभिजीत खांडकेकरनं या अनुभवाविषयी ‘मुंटा’ला सांगितलं, ‘आमची मालिका दक्षिण आफ्रिकेत तिथल्या भाषेत डब होऊन दाखवली जाते, यावर सुरुवातीला माझा विश्वासच बसेना. कलेला भाषेचं बंधन नसतं असं आपण म्हणतो, पण देशांच्या सीमाही नसतात, हे यानिमित्तानं प्रकर्षानं जाणवलं. आफ्रिकेसारख्या दूरच्या देशात आपण कधीतरी केलेलं काम आजही लोकांना आवडतं, ते कौतुक करतात आणि आपल्याला भेटण्याची इच्छा व्यक्त करतात, ही भावना अविश्वसनीय आहे. मराठी भाषा आणि मालिका समुद्रापलीकडच्या आफ्रिकन प्रेक्षकांपर्यंत पोहोचली, त्यांच्याकडूनही तिचं कौतुक होतंय, ही गोष्ट खूप सुखावणारी आहे.’

झी झॉन्की या दक्षिण आफ्रिकेतील वाहिनीवर झुलू भाषेत ‘ माझ्या नवऱ्याची बायको ‘ ही मालिका दाखवली जाते. या मालिकेला तिथे उत्तम प्रतिसाद लाभला आहे. ‘आमची मालिका दक्षिण आफ्रिकेत एवढी आवडण्याचं कारण म्हणजे प्रेक्षक तिच्याशी जोडले गेले. त्यांच्या समाजातही अशा अनेक घटना घडतात, त्यामुळे ही पात्रं त्यांना आपलीशी वाटतात. जसा प्रतिसाद मराठी मध्यमवर्गीय महिलांकडून मिळाला, तसाच प्रतिसाद इथल्या प्रेक्षकांकडूनही मिळतोय’, असं अभिजीत म्हणाला.

Sachin Deshpande Interview : रिल्स स्टारमुळे आम्हाला कोणी विचारत नाहीये, सचिन देशपांडेंची खदखद

Maharashtra TimesMadhurani Gokhale On Navra Maza Navsacha : नवरा माझा नवसाचा मधल्या भूमिकेतलं इंग्रजी आलं कुठून? हातातल्या ब्रश माईकचाही मजेशीर किस्सा, मधुराणी गोखलेने सांगितल्या आठवणी

तिथल्या कार्यक्रमाविषयी अभिजीत म्हणाला, ‘आम्ही जोहान्सबर्ग आणि डर्बन या शहरांमध्ये असणार आहोत. स्थानिक रेडिओ स्टेशन्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि चाहत्यांशी संवाद साधणार आहोत. आमच्या पात्रांना झुलू भाषेत आवाज देणाऱ्या डबिंग कलाकारांसोबतही एका मॉलमध्ये विशेष कार्यक्रम होणार आहे. स्क्रीनवर आमचा सीन दाखवला जाईल, तो मी आणि अनिता प्रत्यक्ष सादर करू, तर झुलू डबिंग कलाकार तो त्यांच्या भाषेत सादर करतील. गुरुनाथ सुभेदार, शनाया, राधिका ही नावं डब केलेल्या मालिकेत तशीच ठेवल्यामुळे इथले प्रेक्षकही आम्हाला त्याच नावांनी ओळखतात.’

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा