Headlines

Bigg Boss 20 Promo Update Salman Khan Hint Viral ; Bigg Boss 20 Promo : अरे कहेना क्या चाहते हो! बॉस 20 चा नवा प्रोमो पाहून प्रेक्षकही बुचकळ्यात, घराऐवजी दिसला आखाडा! सलमानची हिंट कोणालाच समजेना


Salman Khan Bigg Boss 20 Update : सलमान खान चा शो बिग बॉस आता त्याच्या 20 व्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या शोचे प्रोमो समोर आले पण प्रेक्षकांना त्याता अंदाजच लागत नसल्याने सोशल मीडियावर कमेंटची लाट उसळली आहे.

salman khan bigg boss 20
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
भारतातला सर्वात चर्चेत राहणारा आणि वादग्रस्त रिएलिटी शो म्हणजेच ‘बिग बॉस’ आता त्याच्या 20 सीझन सह प्रेक्षकांच्या भेटील येत आहे. त्यामुळे शोची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. या शोच्या निर्मात्यांनी सलमान खानचा एक नवीन प्रोमो रिलीज केला आहे, ज्यामध्ये तो या खेळाच्या एका नवीन आणि महत्त्वच्या नियमाचे संकेत देताना दिसत आहे. केवळ 15 सेकंदांच्या या प्रोमोमध्ये सलमान एका ‘अखाड्या’मध्ये उभा असल्याचे दिसून येते. या अखाड्याचे फोटो यापूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि त्यामुळे तो ‘बिग बॉस’चे नवीन घर असेल अशी चर्चा रंगली होती; मात्र, आता त्याच ठिकाणी सलमानचा नवीन प्रोमो शूट झाल्यामुळे, ही जागाच ‘बिग बॉस 20’चे घर आहे की केवळ प्रोमोसाठी उभारलेला एक सेट आहे, हे कळू शकलेले नाही. शिवाय शोकडूनही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

‘बिग बॉस 20’ चा हा नवीन प्रोमो गुरुवारी, 6 ऑगस्टच्या दुपारी रिलीज झाला. बुधवारी रात्री ‘लॉक अप सीझन 2’ ची विजेती म्हणून श्रेया कालरा आणि ‘अलायन्स’ ची विजेती म्हणून मिनी माथूर यांची घोषणा झाल्यानंतर लगेचच हा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. हे दोन्ही रिअॅलिटी शोज संपल्यामुळे, आता ‘बिग बॉस 20’ आणि ओटीटी (OTT) अशा दोन्ही माध्यमांवर सुरू होण्यासाठी सज्ज झाला आहे.

Maharashtra TimesDipika Kakar Islam Covert Reason : शोएबशी लग्न केले म्हणून मुस्लिम धर्म स्वीकारला हे साफ चूक, सहअभिनेत्रीने सांगितलं दीपिका कक्करचं धर्मांतराचं खरं कारण

घरातील सदस्यांसाठी एक ‘वरदान’… हा नक्की कोणता संकेत?

नवीन प्रोमोमध्ये सलमान खान एका आखाड्यात दिसत आहे. आपल्या खास स्टाइलमध्ये तो म्हणतो, “यावेळी बिग बॉसमध्ये घरातील सदस्यांना एक वरदान मिळणार आहे… तथास्तु, माझ्या प्रिय मित्रांनो.” या प्रोमोवरून हे स्पष्ट होते की, स्पर्धकांना शोमध्ये एका नव्या प्रकारची ‘संधी’ किंवा ‘वरदान’ मिळणार आहे. यावरून आधीच्या प्रोमोमधील त्या संकेतालाही दुजोरा मिळतो, ज्यात सलमानने म्हटले होते की शोमधील घटना या ‘करण अर्जुन’ चित्रपटातील घटनांसारख्याच असतील. त्या आधीच्या हिंट्समुळे ‘पुनर्जन्मा’ची थिएरी या शोमध्ये असू शकते अशी चर्चा सुरू झाली होती.

Maharashtra TimesSatish Rajwade School Days : सतीश राजवाडेंनी शाळेत वॉशरुमच्या भिंतीवर लिहिलेले असे काही की शिक्षेच्या भीतीने स्पिकरच चोरला, कांड समोर आला पण आयुष्य बदललं

‘बिग बॉस’मध्ये ‘तथास्तु’चा अर्थ काय?

‘बिग बॉस 20’चा पहिला प्रोमो आणि आता दुसरा प्रोमो रिलीज झाल्यापासूनच, सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे चाहते ‘तथास्तु’चा अर्थ जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. ‘तथास’ असे म्हटल्यानंतर सलमान ज्या प्रकारे आपल्या बोटाने ‘दोन’ हा आकडा दर्शवतो, त्यामुळे ही उत्सुकता अधिकच वाढली आहे. याबद्दल निश्चितपणे काही सांगणे अद्याप कठीण आहे, तरीही चाहत्यांच्या अंदाजानुसार या सीझनमध्ये ‘तथास्तु’ म्हणजे एक विशेष पॉवर असू शकते; जी स्पर्धकांना कार्यक्रमातून बाहेर काढल्यानंतर एखाद्याला पुन्हा आत आणण्याचा अधिकार देते. आणखी एका अंदाजानुसार, हे एक प्रकारचे ‘वरदान’ असू शकते, ज्याद्वारे एखादा स्पर्धक स्वतःचे नाव एलिमिनेशन प्रक्रियेतून काढून ‘पुनर्जन्म’ मिळवू शकतो.

‘बिग बॉस 20’ ग्रँड प्रीमियर

या दोन प्रोमोंमध्ये, निर्मात्यांनी आधीच जाहीर केले आहे की ‘बिग बॉस 20’ चा ग्रँड प्रीमियर 6 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. यावेळीही हा शो ‘ओटीटी-फर्स्ट’ फॉरमॅटमध्ये असण्याची शक्यता आहे; म्हणजेच, कलर्स टीव्हीवर प्रसारित होण्यापूर्वी याचे भाग दररोज जिओ-हॉटस्टारवर स्ट्रीम केले जातील. विशेष बाब म्हणजे ‘बिग बॉस’चा नवीन सीझन सहाही भाषांमध्ये एकाच वेळी सुरू होणार आहे. तसेच, बंगाली भाषेतले सूत्रसंचालन सौरव गांगुली करणार आहे.

याआधी,4 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या शोच्या पहिल्या प्रोमोमध्ये सलमान खानने घोड्यावर स्वार होऊन एन्ट्री केली आणि घोषणा केली की, “करण अर्जुनमध्ये जे घडलं होतं, तेच आता बिग बॉसमध्येही घडणार आहे… तथास्तु.” तेव्हापासूनच, त्या चित्रपटाच्या संकल्पनेशी मिळतीजुळती अशी ‘पुनर्जन्मा’ची किंवा स्पर्धकांना नव्याने संधी मिळण्याची एक चर्चा या रिअॅलिटी शोबाबत सुरू झाली होती.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा