Headlines

Mandar Jadhav : चार-पाच वर्ष काम नाही, डिप्रेशनमुळे वाईट विचार, पण नाही मानली हार; मंदार जाधवनं सांगितला कठीण काळ


Mandar Jadhav : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम मंदार जाधवनं एका मुलाखतीमध्ये त्याच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल सांगितलं आहे.

Mandar Jadhav On His Struggle
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी अभिनेता मंदार जाधवला स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. यापूर्वी अभिनेत्यानं ‘अल्लादिन’ या हिंदी मालिकेतही काम केलं आहे. पण, प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात अशी वेळ येते, जेव्हा हातात काम नसतं. काही कलाकार डिप्रेशनचा सामना करतात. मंदार जाधवच्या बाबतीतही असंच काहीसं घडलेलं. काम नसल्यामुळे अभिनेता डिप्रेशनमध्ये गेलेला. पण, खचून न जाता, त्यानं स्वतःची समजूत काढली. याबद्दल मंदारनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

मंदार जाधवनं सांगितला कठीण काळ

कठीण काळाबद्दल सांगताना मंदार जाधव म्हणाला की, ‘बऱ्याचदा मी एकट्यात रडलोय. पण, आयुष्याचा एक भाग आहे असा मी विचार केला. या सगळ्या गोष्टीतून मी खूप शिकलोय. मी खूप हट्टी होतो. लहानपणी मला एखादी वस्तू पाहिजे म्हणजे पाहिजे असायची. पण, माझ्या वाईट काळाने मला संयम शिकवला.’

मंदार जाधवने आयुष्यातील खास क्षण केला शेअर

मंदार पुढे म्हणाला की, ‘चार पाच वर्ष काम करत नाहीये, हा खूप मोठा काळ आहे. ज्या वयात लोकांचं करिअर होतं, त्या वयात मी घरी होतो. त्यावेळी मला आयुष्य संपवावं असं वाटलेलं. आपण इतरांपेक्षा खूप कमी आहोत, आणि आपल्याला आयुष्यात काहीच करता येणार नाही, आपली क्षमताच नाहीये, असे बरेच विचार डोक्यात यायचे. मी एवढा डिप्रेशनमध्ये होतो की, माझ्या जीव देण्याचा विचारही आलेला. आमचं नवव्या माळ्यावर घर होतं, तिथे बाल्कनी होती. मी एवढा खचून गेलेलो की, या बाल्कनीतून खाली उडी मारावी, असा विचार माझ्या मनात आलेला. पण, जर मी वाचलो हात-पाय तुटले आणि मला एका जागेवर राहावं लागलं तर अजून वाईट परिस्थिती होईल, असा विचारसुद्धा माझ्या मनात आला.’
Maharashtra TimesGirija Oak : ‘आता आम्ही फार संपर्कात नाही, त्यांचंही कुटुंब आहे’, वडील गिरीश ओक यांच्याबद्दल गिरिजा ओकचं वक्तव्य

अभिनेत्यानं स्वतःला सावरलं

‘पण म्हटलं, आपण खचून गेलेलं नाही चालणार, अजून प्रयत्न करू. त्या दिवसानंतर मी त्याचं बाल्कनीमध्ये व्यायाम करायला सुरुवात केला. तेव्हापासून मी व्यायाम सोडला नाहीये आणि मी स्वतःला समजावलं, स्वतःवर काम केलं.’ असं मंदारनं ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा