Headlines

Maharashtra Youth Builds Website To Track Tukaram Mundhes FDA Actions And Report Food Adulteration | FDA Action: ‘तुम्हीही तुकाराम मुंढेंना करू शकता मदत’; भेसळयुक्त पदार्थांचं थेट लोकेशन पाठवा, तरुण मुलांनी तयार केलीय वेबसाईट


Tukaram Mundhe Action: तुकाराम मुंढे यांच्या भेसळविरोधी कारवायांची चर्चा सुरू असतानाच एका तरुणाने त्यांच्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेबसाईट तयार केली आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Tukaram Mundhe
(फोटो सौजन्य – asakelapahije/Instagram)
महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या खूपच चर्चेत आहेत. राज्यभरात विकल्या जाणाऱ्या भेसळयुक्त पदार्थांवर ते कारवाई करताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यभरातील लोक त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. याच पार्श्वभूमीवर एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. गंमत म्हणजे काही दिवसांपूर्वी चायनीज भेळ खाताना त्यानं एक व्हिडीओ शेअर केला होता. ‘मुंढे साहेब बंद करायच्या आधी चायनीज भेळ खाऊया,’ अशा आशयाची गंमतीशीर रील त्यानं बनवली होती. पण हा व्हिडीओ पाहून तो ट्रोल झाला. लोकांनी त्याच्यावर खूप टीका केली. मात्र, लक्षवेधी बाब म्हणजे या ट्रोलिंगला उत्तर देण्यासाठी त्यानं थेट एक वेबसाईटच बनवली आहे. यामध्ये तुकाराम मुंढे यांनी केलेल्या कारवाया आणि FDA संदर्भातील सर्व प्रकारचे अपडेट्स तुम्हाला मिळू शकतात, असं तो सांगतोय.

वेबसाईटची निर्मिती कशी झाली?

​ ​

हा व्हिडीओ asakelapahije या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. तुकाराम मुंढे हे सध्या अनेक मोठ्या हॉटेल्सवर, मोठमोठ्या फूड ब्रँड्सवर, दुग्धजन्य पदार्थ विकणाऱ्या डेअऱ्यांवर आणि मिठाईच्या दुकानांवर कारवाया करत आहेत. ‘भेसळयुक्त पदार्थ, जिथे तुकाराम मुंढे तिथे,’ अशी स्थिती सध्या राज्यभरात आहे. अन् त्यांचं हेच काम लोकांपर्यंत पोहोचावं, यासाठी या व्हिडीओमधील तरुणानं आपल्या मित्र-मंडळींच्या मदतीनं एका वेबसाईटची निर्मिती केली आहे. या वेबसाईटवर तुम्हाला FDA संदर्भात सर्व प्रकारची माहिती मिळेल. तसंच, जर तुम्हाला एखाद्या हॉटेलमध्ये किंवा कुठेही भेसळयुक्त पदार्थ दिसला, तर त्याबाबत तक्रार करून ती तक्रार तुकाराम मुंढे यांच्यापर्यंत पोहोचवण्याचीदेखील सोय केली आहे.

हा व्हिडीओ झाला होता व्हायरल

​ ​

हा व्हिडीओ २ लाख २४ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. आणि या वेबसाईटच्या निर्मितीला कारणीभूत ठरलेला व्हिडीओ तब्बल २६ लाख वेळा पाहिला गेलाय. असो, भेसळयुक्त पदार्थ शरीरासाठी किती घातक आहेत, हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. पोटदुखी, उलट्या, जुलाब, अन्नातून विषबाधा आणि ऍलर्जी यांसारख्या समस्या भेसळयुक्त पदार्थांमुळे होऊ शकतात. काही प्रकारच्या भेसळीचा दीर्घकाळ संपर्क आरोग्यासाठी गंभीर ठरू शकतो. अन् खाण्याच्या पदार्थांमधील ही भेसळ तुकाराम मुंढे यांच्या कारवायांमुळे हळूहळू आता कमी होऊ लागल्याची चर्चादेखील होताना दिसत आहे.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा