Maharashtra Weather Update Meteorological Department Yellow Alert Mumbai Pune Rain Alert; महाराष्ट्रात हवा बदलली! कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान खात्याचा ताजा अंदाज
Maharashtra Weather Update Meteorological Department Yellow Alert Mumbai Pune Rain Alert; महाराष्ट्रात हवा बदलली! कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान खात्याचा ताजा अंदाज
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून काही भागात जोरदार, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मात्र बहुतांश भागात अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने शेतकरी आणि नागरिक चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
महाराष्ट्रातील आजचे हवामान(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : ऑगस्टचा पंधरवडा गेला तरी पाहिजे तसा पाऊस होताना दिसत नाही. राज्यातील हवामानात सातत्यानं बदल होत असून काही भागात जोरदार, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मात्र बहुतांश भागात अद्याप अपेक्षित असा पाऊस झालेला नसल्यानं शेतकरी आणि नागरिक वर्ग चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
कुठे कसं वातावरण आहे?
कोकण विभागात काही ठिकाणी ढगाळ, तर काही भागात कोरडं हवामान राहण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक आणि रत्नागिरी जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून या भागात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्गमध्ये मात्र कोणताही अलर्ट नाही. उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकसह घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे सांगण्यात आली आहे. या भागात सध्या पावसानं काहीशी विश्रांती घेतली असून पुढील काही दिवसही अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्याला यलो अलर्ट कायम आहे. या भागात जोरदार ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मात्र उद्यापासून बहुतांश भागात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणासह उन्हाचं दर्शनही होऊ शकतं. त्यामुळे उष्णता जाणवण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. जोरदार पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आणखी काही दिवस चांगल्या पावसाची प्रतीक्षा करावी लागू शकते.
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि वाशिमसह बहुतांश जिल्ह्यात कोणताही अलर्ट नाही. या भागात हवामान ढगाळ ते कोरडx राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी सूर्यप्रकाशही जाणवेल. एकूणच, 17 ऑगस्टला कोकण आणि घाटमाथ्याचा काही भाग वगळता राज्यात जोरदार पावसाचा इशारा नाही. त्यानंतरही बहुतांश भागात पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज आहे. ऑगस्टचा मध्य उलटूनही राज्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नसल्यानं शेतकरी आणि नागरिकांचं लक्ष आता पुढील पावसाकडे लागलं आहे. हवामान विभाग आणि कृषी विभागाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा