Mumbai Rain News : मुंबईतल्या दमदार पावसामुळे ‘विहार’ पाठोपाठ ‘तुळसी’ तलाव ओसंडून वाहू लागला
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी एक आणि बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी एक असणारा ‘तुळशी तलाव’ मंगळवार, दिनांक ७ जुलै २०२६ रोजी रात्री ११:४३ वाजता पूर्ण ओसंडून वाहू लागला आहे. मुंबईत होत असलेल्या दमदार पावसामुळे मंगळवारी दिनांक ७ जुलै २०२६ च्या रात्री ९ वाजता ‘विहार’ तलाव ओसंडून वाहू लागला, आणि त्या पाठोपाठ लगेचच रात्री ११ वाजून ४३ मिनिटांनी ‘तुळशी’ तलाव देखील ओसंडून वाहू लागला आहे. मात्र, असे असले तरीही मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील एकूण जलसाठा हा कमाल क्षमतेच्या ४१.४३ टक्के इतका झाला आहे.
![]()
