Headlines

Maharashtra rain 13 dead important appeal from cm devendra fadnavis; महाराष्ट्रात पावसाने हाहा:कार; १३ जणांचा मृत्यू, तर १० जण जखमी


मुंबई: मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मागील दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढलं असून काही ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. राज्यभरात पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत एकूण १३ जणांना आपला जीव गमवावा लागला असून १० जण जखमी झाले आहेत. ५ जुलै रोजी मानखुर्द येथे झोपडपट्टीवर इमारत कोसळून ६ जणांनी आपला जीव गमावला, तर पालघरमध्ये पोहताना बुडून एक जण, मुंबई उपनगरात झाड कोसळून दोन जण, साताऱ्यात दरड कोसळून एक जण, सिंधुदुर्गात बुडून एक जण, पुण्यात दरड कोसळून एक जण, ठाण्यात पाण्यात बुडून एक जण तर घर कोसळून एक जण, रायगडमध्ये पाण्यात बुडून एक जण अशा एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

पावसाचा परिणाम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर झाला असून पुणे-मुंबई एक्सप्रेसवे व जुना महामार्ग, मिसिंग लिंक रस्ता, रेल्वे मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवली आहे. तर मावळ व ताम्हिणी घाटात पूरस्थिती असून पर्यायी मार्ग प्रभावित झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास टाळावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

आपत्कालीन परिस्थितीत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

महाराष्ट्रात उद्भवलेल्या संभाव्य पूरपरिस्थिती आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला सतर्क राहण्याचं व प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. राज्यात कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी राज्य सरकारची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून २४ तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूत्रांकडून येणाऱ्या माहितीचा आधार घ्यावा आणि संकटसमयी जाहीर केलेल्या अधिकृत हेल्पलाईन क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

कोणत्या क्रमांकावर संपर्क साधता येणार?

राज्यस्तरीय मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी १०७० हा टोल-फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून, नागरिक ०९३२१५८७१४३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा ०२२-२२०२७९९० आणि ०२२-२२७९४२२९ या दूरध्वनी क्रमांकांवर देखील थेट संपर्क साधता येईल. याशिवाय, प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थानिक पातळीवर जलद गतीने मदत कार्य राबवण्यासाठी आणि परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षही सज्ज ठेवण्यात आले आहेत, ज्यांचा मुख्य संपर्क क्रमांक १०७७ असा आहे, असंही आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

दरम्यान, कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी नागरिकांनी अजिबात न घाबरता या जाहीर केलेल्या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधून प्रशासकीय यंत्रणेची मदत घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत