त. भा. प्रतिनिधी पुणे
मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, मुंबई-पुणे संपर्क तुटणे ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. त्यामुळे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या कामाची पारदर्शक चौकशी करून त्यावर झालेल्या खर्चाचे ऑडिट सार्वजनिक करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी येथे केली.
पावसामुळे मिसिंग लिंक प्रकल्पाचे पितळे उघडे असून, महामार्गावर निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या, मिसिंग लिंकचे व्हिडिओ सुऊवातीला कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय) तयार केलेले असावेत, असे वाटले. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यानंतर विश्वास बसत नाही. हा मोठा प्रकल्प सुरू झाला, तेव्हा वेळ वाचेल म्हणून आम्हीही त्याचे स्वागत केले होते. मात्र, एवढा निधी खर्च करूनही प्रत्यक्ष कामात मोठी विसंगती दिसून येत आहे. या प्रकल्पात घोटाळा झाला, असे मी म्हणणार नाही. मात्र, किती खर्च झाला. कामाचे ऑडिट झाले का, सुरक्षिततेच्या निकषांचे पालन झाले का, या सर्व प्रश्नांची उत्तरे राज्य सरकारने द्यावीत. मुख्यमंत्र्यांनी याबाबत तातडीने भूमिका स्पष्ट करावी”.
राज्यातील पावसाच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना सुळे म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी तातडीने आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्याचा विचार करावा. नागरिकांनी शक्मयतो प्रवास टाळावा. एका पावसात महाराष्ट्र ठप्प झाला आहे. मुंबई-पुणे दरम्यानचे तीनही प्रमुख मार्ग बंद होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. पायाभूत सुविधा विकासावरही त्यांनी प्रŽ उपस्थित केले. सरकार स्वत:ला ‘इन्फ्रास्ट्रक्चर सरकार’ म्हणवते. मात्र, विकासकामांमध्ये सुरक्षितता आणि पर्यावरणाचा विचार नसेल, तर अशा प्रकल्पांचा उपयोग काय? असा सवाल त्यांनी केला.
