Headlines

Maharashtra Mumbai Pune Rain Alert IMD Weather Forecast Red Alert Heavy Rain Thane Raigad Kokan Vidarbha Weather Forecast; पावसाचा कहर; मुंबईसह उपनगरात मुसळधार, तिन्ही मार्गावरील लोकल उशिराने, रस्ते वाहतूक ठप्प, चाकरमान्यांचे हाल; रेड अलर्ट जारी


Maharashtra-Mumbai Latest Rain Update : राज्यात अनेक भागात दुर्घटना होऊन जीवितहानीसह जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच आज देखील पावसाचा कहर कायम राहणार असून हवामान विभागानं राज्यातील अनेक जिल्ह्यांना खबरदारीचा इशारा दिला आहे.

Maharashtra-Mumbai Latest Rain Update
महाराष्ट्र मुंबई पाऊस अपडेट्स(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसापासून पावासाची तुफान बॅटिंग सुरु आहे. अशातच मुंबईसह उपनगरात मात्र मुसळधार पावसाचा रुद्ररुप बघायला मिळालं आहे. मुंबई आणि परिसराला रविवारी, सलग दुसऱ्या दिवशी, मुसळधार पावसाने झोडपून काढले. मानखुर्द येथे एका चाळीतील तीन मजली घर कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यामुळे या घटनेत 5 निष्पाप लहान मुले आणि एका महिलेसह 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर पावसात झाडे कोसळण्याच्या घटनांचं सत्र सुरूच असून कुर्ला आणि गोरेगाव येथे दोघांचा झाडांच्या फांद्या कोसळून मृत्यू झाला. तर नवी मुंबई आणि पनवेल येथे अतिवृष्टीशी संबंधित घटनांमध्ये चार जण ठार झाले. अशातच आज सोमवारी देखील पावसाचा कहर कायम राहणार असून हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना खबरदारीचा इशारा दिला आहे.

कोणत्या जिल्ह्यात काय परस्थिती?

मुंबईप्रमाणेच कोकणात देखील मुसळधार पावसाचा कहर बघायला मिळत आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागानं आज पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. या जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. परिणामी, कोकण विभागात पावसाचा सर्वाधिक प्रभाव कायम राहणार असल्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता असल्याने रेड अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

तर हवामान विभागाने आज सोमवारी पुणे जिल्ह्यासाठी पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. पुणे शहरातील शाळांना महापौर मंजूषा नागपुरे यांनी सुट्टी जाहीर केली. नाशिक जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’चा अंदाज आहे. तसेच घाटमाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Maharashtra TimesVande Bharat : वेगवान वंदे भारतमुळे उड्डाणपुलावर फवारे, व्हिडिओ खरा की AI? ‘परे’-‘मरे’च्या परस्पर विरोधी दाव्यांनी संभ्रम
तर हवामान विभागाने आज सोमवारी पुणे जिल्ह्यासाठी पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. पुणे शहरातील शाळांना महापौर मंजूषा नागपुरे यांनी सुट्टी जाहीर केली. नाशिक जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’चा अंदाज आहे. तसेच घाटमाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

एक्स्प्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दहिसर परिसरात जोरदार पावसामुळे वाहनांच्या गतीवर परिणाम झाला आहे. आज सोमवार असल्यानं आठवड्याचा पहिलाच कार्यालयीन दिवस आहे. त्यामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळेत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी वाहतुकीची माहिती तपासून पुरेसा वेळ हाताशी ठेवावा, तसेच अत्यावश्यक काम असल्यासच प्रवास करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. हवामान विभागाने आजही मुसळधार पावसाचा इशारा दिला असून पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
Maharashtra TimesMumbai Rain: ‘कोसळ’धारांचे 12 बळी; सलग दुसऱ्या दिवशी महामुंबई परिसराला पावसाने झोडपले, दुर्घटनांची मालिका सुरुच

मुंबईची लाईफलाईन उशिराने

मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल रेल्वेचे वेळापत्रक काही प्रमाणात कोलमडलं आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या 15 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. वसई, नालासोपारा आणि विक्रोळी परिसरात रुळांवर पाणी साचल्यामुळे काही लोकल धीम्या गतीने चालवण्यात येत आहेत. कर्जत-लोणावळ्यादरम्यान घाटात दरड कोसळल्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द किंवा वळवण्यात आल्या आहेत. प्रवाशांना प्रवासापूर्वी रेल्वेच्या स्थितीची खात्री करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Maharashtra TimesVenna Lake : महाराष्ट्राच्या ‘मिनी काश्मीर’ची तहान भागवणारा वेण्णा तलाव तुडुंब! महाबळेश्वर-पाचगणीकरांची चिंता मिटली

मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नव्याने उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही तासांपासून लोणावळ्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये लोणावळा आणि तळेगाव परिसरात सरासरीपेक्षा कितीतरी पट अधिक पाऊस झाला आहे. अशातच मिसिंग लिंकच्या एन्ट्री पॉईंटवर एक मोठा स्लॅब कोसळला आहे. हा स्लॅब कोसळून छताच्या भागातून डोंगरावरील राडारोडा खाली पडत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. वाहतूक पूर्णपणे बंद नसली तरी अतिशय धीम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना आज सोमवारी मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास टाळावाच, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा