Headlines

Maharashtra Ministers of all parties gave recommendation letters to municipal engineers for transfer; नार्वेकर, शिंदे, कोकाटे ते दानवे… महापालिका अभियंता बदली-पदोन्नतीसाठी मंत्र्यांच्या शिफारशी, माहिती अधिकारात ‘फील्डिंग’ उघड


सुशांत मोरे, मुंबई : मुंबई महापालिकेतील १२२ सहाय्यक व दुय्यम अभियंत्यांच्या ऑनलाइन परीक्षेआधीच ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या बदल्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतल्यानंतर, तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांची बदली करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात राज्य सरकारमधील मंत्री, आमदार, खासदारांसह सर्वपक्षीय नेत्यांकडून महापालिकेतील अभियंत्यांच्या पदोन्नती, पदस्थापना आणि बदल्यांसाठी मोठ्या प्रमाणात शिफारशी होत असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.

सन २०२४, २०२५ आणि २०२६ या काळात अशा अनेक शिफारशी करण्यात आल्या. शिफारसपत्रे देणाऱ्यांमध्ये मंत्री गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, उदय सामंत, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मंत्री, आमदारांची नावे आहेत. विरोधी पक्षातील अंबादास दानवे, महेश सावंत आदींचाही यात समावेश असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. विशेष म्हणजे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानसभा उपाध्यक्ष अण्णा दादू बनसोडे यांनीही शिफारसपत्रे दिल्याचे समोर आले आहे.

अभियंत्यांकडून जोरदार फिल्डिंग

मुंबई महापालिकेत पदोन्नती व बदल्यांसाठी अभियंत्यांकडून जोरदार फिल्डिंग लावली जात असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. जलअभियंता विभाग, स्थापत्य विभाग, पर्यावरण विभाग, आरोग्य विभाग, पर्जन्य जलवाहिनी विभाग आदी विभागांतील अभियंत्यांनी बदल्यांसाठी नेत्यांमार्फत शिफारशी केल्या आहेत. काही मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्रे दिली असून, त्यांची प्रत मुंबई महापालिकेकडे पाठविल्याचे समोर आले आहे.

Maharashtra TimesCrime News : दोन वर्षांपासून वेगवेगळ्या खोलीत वास्तव्य, नवरा झोपल्याची तीनदा खात्री केली, बॉयफ्रेण्ड घरी पोहोचला, काळरात्री भयंकर घडलं

विविध कारणास्तव बदली-पदोन्नतीची मागणी

माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी ही माहिती उघड केली आहे. रिक्त पदावर पदोन्नती किंवा पदस्थापनेसाठी मोठ्या प्रमाणात शिफारशी केल्या आहेत. काही अभियंत्यांनी सहा-सात वर्षे एकाच पदावर काम केल्याने दुसऱ्या विभागात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काहींनी कौटुंबिक कारणास्तव बदलीची मागणी केली आहे. शिफारशींमध्ये कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता आणि सहायक अभियंता यांचा मोठा समावेश आहे.

‘मुख्यमंत्र्यांनी अधिसूचना काढावी’

‘गेल्या तीन वर्षांत महापालिकेतील अभियंत्यांना अन्य विभागात बदली मिळावी, यासाठी सत्ताधारी पक्षातील मंत्री, आमदार, खासदारांकडून मोठ्या प्रमाणात शिफारशी करण्यात आल्या. विरोधकांनीही शिफारसपत्रे दिली आहेत. विभागीय चौकशी सुरू असलेल्या काही अभियंत्यांचाही शिफारशींमध्ये समावेश असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले,’ असे दौंडकर यांनी सांगितले. मुंबईबाहेरील आमदार, खासदारांनीही मुंबई महापालिकेतील अभियंत्यांसाठी शिफारसपत्रे दिली आहेत.

लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारच्या शिफारशी करू नयेत, यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिसूचना काढावी, अशी मागणी करणार असल्याचे दौंडकर यांनी सांगितले.

Maharashtra TimesTesticle Traffickers : तरुणाचा जीव घेतला, पण प्रायव्हेट पार्ट कोणी विकत घेईना, आरोपींनी दोन तलावात अवयव फेकले, आता भलतीच समस्या

यांनी दिली शिफारसपत्रे

राहुल नार्वेकर (विधानसभा अध्यक्ष), अण्णा दादू बनसोडे (विधानसभा उपाध्यक्ष), अमित साटम (मुंबई भाजप अध्यक्ष), गिरीश महाजन (जलसंपदा मंत्री), माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट (सामाजिक न्याय मंत्री), चंद्रशेखर बावनकुळे (महसूल मंत्री), पंकजा मुंडे (पर्यावरण मंत्री), शिवेंद्रराजे भोसले (सार्व. बांधकाम मंत्री), उदय सामंत (उद्योगमंत्री), राधाकृष्ण विखे पाटील (मंत्री), भरत गोगावले (रोहयो मंत्री), प्रकाश आबिटकर, (आरोग्य मंत्री), कालिदास कोळंबकर (आमदार), प्रसाद लाड (आमदार), रामदास आठवले (केंद्रीय राज्यमंत्री), मंगलप्रभात लोढा (मंत्री), प्रवीण दरेकर (आमदार), गोपिचंद पडळकर (आमदार), तुकाराम काते (आमदार), दिलीप लांडे (आमदार), नरहरी झिरवळ (मंत्री), प्रकाश सुर्वे (आमदार), महेश सावंत (आमदार), अंबादास दानवे (आमदार), सुनील प्रभू (आमदार), श्रीकांत शिंदे (खासदार), गणेश नाईक (मंत्री), राहुल शेवाळे (माजी खासदार)

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत