![]()
MPSC Paper Leak : गर्लफ्रेण्डला खुश करायला गौरवने पेपर फोडला, पण औषध निरीक्षक होताच तिने ब्रेकअप केलं, पठ्ठ्याची पोलिसांना टिप, चॅटिंगही समोर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने बुधवारी सहा जणांना अटक केली. यामध्ये ‘एमपीएससी’च्या तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गर्लफ्रेण्डसाठी काहीतरी करायला पाहिजे, या भावनेने एका तरुणाने एमपीएससीच्या अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करत औषध निरीक्षकपदाच्या परीक्षेचे काही प्रश्न प्रेयसीला मिळवून दिले. तरुणी परीक्षेत सातवी आली, औषध निरीक्षक झाली आणि तिने ब्रेकअप केलं. त्यामुळे प्रेमभंग झालेल्या प्रियकराने पोलिसांना याची टिप देऊन पर्दाफाश केला.
