राज्यात सुट्ट्या तेलावर बंदी घालण्याचा आदेश काढला आहे. त्यामुळं सुट्टे तेल विकण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून राज्यभरातील दुकानदारांना सुट्टे तेल विकता येत नाहीय. पॅकिंग नसलेले किंवा उघड्यावर मिळणारे सुट्टे तेल आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते आणि त्यात भेसळीची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळं जनआरोग्याच्या हितासाठी हा निर्णय निश्चीतपणे चांगला आणि महत्त्वाचा आहे. मात्र दुसरीकडे ग्रामीण भागात, आणि आठवडी बाजारात सध्या वेगळं चित्र आहे. ज्याचं घर मोलमजूरी आणि कष्टाची काम करून रोजच्या रोजंदारीतून चालतं त्या सर्व अत्यंत गरीब घटकातील नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे सुट्टं तेल बंदीचा निर्णय मागे घ्या, यासाठी तेल व्यापारी एकवटले असून त्यांनी सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. सुट्ट्या तेलाच्या विक्रीवरील बंदीवरून त्यांनी थेट कोर्टात जाण्यासह राज्यभर तीव्र आंदोलनांचा इशारा दिला आहे. याच मुद्द्यावरून आता विजय वडेट्टीवारांनीही कोल्हापुरात चंद्रशेखर बावनकुळेंसमोर थेट नाराजी जाहीर करत निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. तर, बावनकुळेंनीही हे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्याचं आश्वासन दिलं आहे. तेव्हा सुट्ट्या तेल विक्रीवरून नेमका वाद का सुरू झालाय, ही बंदी घालताना नियम मोडणाऱ्यांवर कोणता कठोर कारवाईचा इशारा दिलेला आहे आणि गरीब कुटुंबासह, तेली समाजाचा कोणता प्रश्न निर्णय झालाय, सरकार यावर कोणती भूमिका घेणार हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत.#FDA #FoodAndDrugs #TukaramMundhe #LooseOilBan #MaharashtraLooseOilBan #LooseOilSaleBan #MaharashtraOilBan #LooseEdibleOil #EdibleOilBan #MaharashtraGovernment #OilTradersProtest #OilTraders #VijayWadettiwar #ChandrashekharBawankule #LooseOilControversy #OilAdulteration #AdulteratedOil #PublicHealth #RuralMaharashtra #PoorFamilies #TeliCommunity #MaharashtraNews #MarathiNews #FoodSafety #EdibleOilNews #MaharashtraPolitics #GovernmentDecision #OilBusiness #OilMarket #LooseOilNewsMaharashtra FDA Commissioner has banned the sale of loose cooking oil across the state, citing public health and concerns over adulteration. While the move is seen as important for consumer safety, it has hit poor families in rural areas and weekly markets the hardest. Oil traders have given the government a 15-day ultimatum and warned of legal action and statewide protests. Meanwhile, Vijay Wadettiwar has urged Chandrashekhar Bawankule to withdraw the ban, with Bawankule assuring that he will raise the issue with the Chief Minister. What is behind the controversy, what action will violators face, and what will the government decide? We explain everything in this video.