Lohagad Murder Case Siya Goyal Chetan Chaudhary practiced at Lulla Nagar to push off Ketan Agarwal; लोहगडावरुन केतनला कसं ढकलायचं, लुल्लानगरच्या टेकडीवर केलेली प्रॅक्टिस; पकडलं गेल्यास काय? सिया-चेतनचं प्लॅनिंग समोर
Lohagad Murder Case Siya Goyal Chetan Chaudhary practiced at Lulla Nagar to push off Ketan Agarwal; लोहगडावरुन केतनला कसं ढकलायचं, लुल्लानगरच्या टेकडीवर केलेली प्रॅक्टिस; पकडलं गेल्यास काय? सिया-चेतनचं प्लॅनिंग समोर
Lohagad Murder Case : गंगाधाम ते लुल्लानगर या रस्त्यावरील छोट्या टेकडीवर सराव केल्याचे सिया-चेतनने पोलिसांना सांगितले. त्यानुसार त्या ठिकाणी पंचनामा केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पुणे ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी मुख्य आरोपी सिया गोयल हिला पुण्यातील लुल्लानगर परिसरात नेऊन स्पॉट पंचनामा केला. येथेच सिया गोयल व चेतन चौधरी यांनी केतन याला दरीत ढकलण्याचा सराव केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
छोट्या टेकडीवर ढकलण्याचा सराव
या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याने पोलिसांचा तपास परिस्थितीजन्य आणि तांत्रिक पुराव्यांवर केंद्रित आहे. गंगाधाम ते लुल्लानगर या रस्त्यावरील छोट्या टेकडीवर सराव केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार त्या ठिकाणी पंचनामा केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिस करीत आहेत. आतापर्यंत सियाचा भाऊ साहिल, वडील प्रवीण, आई पूजा यांच्यासह गोयल कुटुंबीयांची चौकशी केली आली आहे; तसेच सिया आणि केतन यांचे लग्न ठरवण्यात मध्यस्थी करणाऱ्या मित्तल दाम्पत्याचा जबाबही नोंदवला आहे. बाली येथे प्री-वेडिंग शूटसाठी जाताना त्यांना मुंबई विमानतळापर्यंत सोडणाऱ्या कॅब चालकाचीही चौकशी केली आहे. या कटात अन्य कोणाचा सहभाग आहे का याबाबत पोलिसांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही.
‘तिसऱ्या व्यक्तीला दूर ठेवून रचला कट’
गुन्ह्याचा कोणताही धागा पोलिसांच्या हाती लागू नये, यासाठी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीला विश्वासात न घेता केतन अग्रवालच्या हत्येचा संपूर्ण कट स्वतःच रचल्याचे तपासात समोर आले आहे. पकडले गेल्यास काय उत्तर द्यायचे, अपघाती मृत्यूचा बनाव कसा उभा करायचा आणि चौकशीला कसे सामोरे जायचे, याचेही त्यांनी आधीच नियोजन केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
Chandrakant Khaire | सचिन अहिरांचा शिवसेनेत प्रवेश, चंद्रकांत खैरेंनी गद्दार म्हणत चांगलंच सुनावलं
पोलिसांच्या माहितीनुसार, केतन अग्रवालचा १८ जूनला लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचे भासविण्यात आले. मात्र, घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर अपघाती मृत्यूची शक्यता कमी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर लोहगड किल्ल्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये उष्ण वातावरणात हुडी परिधान करून फिरणाऱ्या तरुणाचा माग काढून पोलिस चेतन चौधरीपर्यंत पोहोचले आणि तपासाला निर्णायक दिशा मिळाली. Vihan Shrivastav : आमचं बाळ आता परत येणार नाही… विहानच्या पार्थिवाशेजारी क्रिकेटचा बॉल ठेवला, जड अंतःकरणाने अखेरचा निरोप, पाऊसही धाय मोकलून रडला
केतनच्या मोबाईलमधून डेटा हटवल्याचा संशय
केतन अग्रवाल याच्या मोबाइलमधील काही माहिती सिया गोयलने हटवल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे संबंधित मोबाइल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. केतन दरीत पडण्यापूर्वी त्याचा मोबाइल सियाकडे कसा आला आणि कुटुंबीय घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी त्यातील कोणताही डेटा हटवण्यात आला होता का, याचा तपास पोलिस करीत आहेत.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा