Lioness Outsmarts Crocodile to Save Her Cub in Dramatic Wildlife Encounter | ‘माझं पिल्लू सोड नाहीतर तुझ्या पिल्लाचा जीव घेईन’, सिंहीणीनं मगरीला केलं ब्लॅकमेल, जंगलातील जीवघेणी लढाई व्हायरल
Lioness Outsmarts Crocodile to Save Her Cub in Dramatic Wildlife Encounter | ‘माझं पिल्लू सोड नाहीतर तुझ्या पिल्लाचा जीव घेईन’, सिंहीणीनं मगरीला केलं ब्लॅकमेल, जंगलातील जीवघेणी लढाई व्हायरल
Viral Wildlife Video: सिंहिणीनं हुशारी दाखवत मगरीचं पिल्लू पकडलं. त्यामुळे स्वतःचं पिल्लू वाचवण्यासाठी मगरीला सिंहाचं पिल्लू सोडावं लागलं. जंगलातील हा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
ai generated images
सिंह हा जंगलातील अत्यंत खतरनाक शिकारी मानला जातो. कारण एकतर त्याच्याकडे प्रचंड ताकद असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिंह हा वाघासारखा एकटा हल्ला करत नाही. संपूर्ण कळप मिळून नियोजनबद्ध पद्धतीनं शिकार करतो. याचीच झलक तुम्ही सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पाहू शकता. एका मगरीनं सिंहाच्या पिल्लाला पकडलं होतं. त्या पिल्लाला आपल्या जबड्यात पकडून खोल पाण्यात घेऊन जाण्याचा मगर प्रयत्न करत होती. पण तितक्यात सिंहिणीनं मगरीच्या पिल्लाला पकडलं आणि पाठीमागून इतर सिंहिणींनी मगरीवर हल्ला केला. अखेर स्वतःच्या पिल्लाला वाचवण्यासाठी मगरीला सिंहाचं पिल्लू सोडून द्यावं लागलं. जंगली प्राण्यांची ही हुशारी पाहून तुम्हीही नक्कीच अवाक् व्हाल.
कशी केली पिल्लाची सुटका?
हा व्हिडीओ newsflashlq या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. मगरीला पाण्यातील राजा म्हटलं जातं, तर दुसरीकडे सिंह हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. दोन राजे जेव्हा समोरासमोर येतात, तेव्हा काय घडतं हे तुम्ही या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता. मगरीनं सिंहाचं पिल्लू जबड्यात घट्ट पकडून ठेवलं होतं. मात्र, सिंहिणीनंही प्रसंगावधान दाखवत मगरीचं पिल्लू पकडलं. त्यामुळे अखेर स्वतःच्या पिल्लाच्या रक्षणासाठी मगरीला सिंहाच्या पिल्लाला सोडून द्यावं लागलं. (फोटो सौजन्य – Derek Keats/pexels.com)
युद्धात कोणी मारली बाजी?
हा व्हिडीओ १ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. शिवाय अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी सिंहिणीच्या हुशारीचं कौतुक करत आहे. कारण कितीही ताकद लावली तरी तिला मगरीच्या तोंडातून आपल्या पिल्लाला बाहेर काढणं शक्य झालं नसतं. तर काही जण “जंगली प्राण्यांना बॉलिवूड चित्रपट दाखवू नका,” अशी मिश्कील प्रतिक्रिया देत आहेत. असो, प्राण्यांच्या जगातील ही लढाई तुम्हाला कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.
लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.
डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.
महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.
क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.
शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.… आणखी वाचा