Headlines

Lion Cubs Bond With Deer Fawn Goes Viral Netizens Left Emotional | सिंहाचं पिल्लू हरणासाठी ढाल बनून उभं राहिलं! पिल्लाची डकराळी ऐकून सिंह सुद्धा घाबरला, व्हिडीओ पाहून अंगावर येतील शहारे


Lion and Deer Friendship Video: सिंहाच्या पिल्लाने हरणाच्या पाडसाचे रक्षण केले. जंगलातील हा व्हिडिओ पाहून तुमचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. लोक म्हणत आहेत, मैत्रीमध्ये काहीही अशक्य नसतं.

Lion Saves Deer
(फोटो सौजन्य – virallpaws/Instagram)
‘घोड्यानं जर गवताशी मैत्री केली तर तो खाणार काय?’ अशी एक प्रसिद्ध म्हण आहे. याचा अर्थ असा की, ज्याच्यावर आपला उदरनिर्वाह अवलंबून आहे, त्याच्यासोबत असा कुठलाही व्यवहार करू नये, ज्यामुळे आपले नुकसान होईल. पण या नियमाला अपवाद ठरणारा एक प्रसंग समोर आला आहे. सिंहाच्या पिल्लाने चक्क एका हरणाच्या पिल्लाचे प्राण वाचवले.

सिंह शिकार करण्याच्या उद्देशाने त्या पिल्लासमोर उभा राहिला. पण सिंहाचे पिल्लू एखाद्या सुपरहिरोसारखे आपल्या वडिलांसमोर उभे राहिले आणि त्याने एकच डरकाळी फोडली. आश्चर्य म्हणजे, पिल्लाचा तो रौद्र अवतार पाहून सिंहसुद्धा मागे सरकला आणि त्याच्या मित्राचे प्राण वाचले. वास्तविक, हरीण हे सिंहांचे मुख्य खाद्य मानले जाते. पण इथे सिंह आणि हरणामध्ये मैत्री होताना दिसत आहे. हा चमत्कारिक व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

नेमकं काय घडलं?

​ ​

हा व्हिडिओ virallpaws या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, हरणाचं एक पिल्लू आपल्या कळपापासून वेगळं झालं आहे. आपल्या कुटुंबाचा शोध घेत असताना ते चुकून सिंहांच्या कळपात पोहोचतं. याच दरम्यान सिंहाच्या एका पिल्लाची त्या हरणाच्या पाडसाशी मैत्री होते. काही वेळाने कळपाचा प्रमुख सिंह त्या पाडसाची शिकार करण्यासाठी पुढे सरसावतो. मात्र, सिंहाचं पिल्लू आपल्या मित्राच्या रक्षणासाठी त्याच्यासमोर ठामपणे उभं राहतं आणि पूर्ण ताकदीनिशी डरकाळी फोडतं. वास्तविक, सिंह त्या पिल्लाला एका क्षणात बाजूला सारून हरणाची शिकार करू शकला असता. पण आश्चर्य म्हणजे, तो तसं करत नाही. उलट आपल्या पिल्लाच्या मैत्रीचा आदर राखत तो मागे सरकतो. त्यानंतर ते हरणाचं पिल्लू सिंहाच्या कुटुंबाचाच एक भाग बनल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतं.

नेटकरी करताहेत सिंहाचं कौतुक

​ ​

हा व्हिडिओ ५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच, अनेकांनी या व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणत आहे, हा व्हिडिओ पाहून डोळ्यांत नकळत अश्रू आले. तर काहींच्या मते हा व्हिडिओ AI-जनरेटेड आहे. अर्थात, हा व्हिडिओ AI-जनरेटेड असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण हल्ली AI तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे की, अनेकदा काल्पनिक व्हिडिओसुद्धा खऱ्यासारखे वाटतात. असो, पण जरी हा व्हिडिओ AI-जनरेटेड असला, तरी प्राण्यांच्या या जगाचं चित्रण पाहून एका क्षणासाठी का होईना, तुमच्याही डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा