Police Constable Dies Outside Salman Khan house:अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 41 वर्षीय कॉन्स्टेबल गणेश रायते यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं समोर आलें आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षेचे कर्तव्य बजावत असताना गणेश रायते यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि ते खाली कोसळले. तिथं उपस्थित असलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केलं.प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार, त्यांचा मृत्यू तीव्र हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं स्पष्ट झालं आहे. गणेश रायते हे लष्करातून मुंबई पोलिसांमध्ये भरती झाले होते.
Dada Kondke : प्रकृती अचानक खालावली, ॲम्ब्युलन्स मिळेना, गाडीनं बॉडी घरी आणली; दादा कोंडकेंच्या निधनाचा अंगावर काटा आणणारा प्रसंग
कडक सुरक्षेदरम्यान घडली घटना
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून मिळणाऱ्या सततच्या धमक्यांमुळं अभिनेता सलमान खानला वाय-प्लस (Y+) दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर त्याच्या वांद्रे इथल्या घराबाहेर २४ तास पोलिसांचा मोठा ताफा तैनात असतो. यापूर्वी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबाराची घटना घडल्याने या परिसरातील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली होती. कर्तव्यावर असताना अचानक घडलेल्या या घटनेमुळं पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
प्रशांत दामलेंनी मु.पो. बोंबिलवाडीला होकार देण्याचं गंमतीशीर कारण
Usha Nadkarni Awards:’माझ्या पेक्षा लहान अभिनेत्रींना पुरस्कार, माझं वय वाढलंय, पण’ जीवनगौरव पुरस्कारावर स्पष्टच बोलल्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी
सलमान खान , त्याची बहीण अलविरा खान-अग्निहोत्री यांना कोर्टाची नोटीस
तर सलमान खान, त्याची बहीण अलविरा खान-अग्निहोत्री आणि ‘स्टाईल अँड कन्टेन्ट ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड’च्या संचालकांना चंदीगड जिल्हा न्यायालयाने नोटीस बजावली आहे. ‘बीइंग ह्युमन’ ब्रँडच्या ज्वेलरी फ्रँचायझीशी संबंधित ३ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात न्यायालयानं ही कारवाई केली आहे. चंदीगड इथल्या व्यावसायिक अरुण गुप्ता यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून ही नोटीस जारी करण्यात आली आहे.
चंदीगडमधील मणीमाजरा भागात ‘बीइंग ह्युमन’ ज्वेलरीचा शोरूम सुरू करण्यासाठी त्यांनी सुमारे ३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. अटींची पूर्तता: या प्रकरणासाठी त्यांनी ब्रँडचे अधिकृत मार्केटिंग करणाऱ्या कंपनीसोबत करार केला आणि त्यांच्या सर्व अटी पूर्ण केल्या. केवळ शोरूमच्या उभारणीवरच १ कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला होता. वचनांची नासधूस: व्यवसाय सुरू करताना मोठ्या नफ्याचे आश्वासन आणि पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, शोरूम सुरू झाल्यावर कंपनीकडून कोणतेही सहकार्य मिळालं नाही.

