Leena Chandavarkar : बॉलिवूड अभिनेत्री लीना चंदावरकर यांचं वैयक्तिक आयुष्य अत्यंत दुःखात गेलं. लग्नाच्या काही दिवसांतच अभिनेत्रीच्या पहिल्या पतीचा मृत्यू झालेला.

वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी लीना यांनी आपल्या पहिल्या पतीला गमावलं. कर्नाटकातील एका कोकणी कुटुंबात जन्मलेल्या लीना यांनी १९५५ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी लग्न केलं. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा मुलगा सिद्धार्थ बांदोडकर यांच्याशी लीना यांचं लग्न झालेलं. मात्र, लग्नाच्या अवघ्या ११ दिवसांनंतर अभिनेत्रीच्या पतीचं निधन झालं.
Girija Oak : ‘आता आम्ही फार संपर्कात नाही, त्यांचंही कुटुंब आहे’, वडील गिरीश ओक यांच्याबद्दल गिरिजा ओकचं वक्तव्य
लीना चंदावरकर यांनी फिल्मफेअरला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं की, जेव्हा त्या आणि त्यांचे पती हनिमूनला जाण्याची तयारी करत होते, तेव्हा त्यांनी आपली रिव्हॉल्वर बाहेर काढून ते साफ करण्यास सुरुवात केली. मात्र, बंदूक साफ करत असताना, ती बंदूक चुकून चालली आणि थेट त्यांना गोळी लागली. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण ते वाचले नाहीत.
Mugdha Shah : बालपणी सावत्र आईकडून झालेला छळ, घरातून पळून गेली, विरार फास्टमधून उडी; मराठी अभिनेत्रीनं सांगितला कठीण काळ
किशोर कुमार पहिल्याच भेटीत लीना यांच्या प्रेमात पडले
लीना यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितलेलं की, पतीच्या मृत्यूनंतर सिद्धार्थ यांच्या कुटुंबीयांनी त्यांना टोचून बोलायला सुरुवात केली, त्यामुळे अभिनेत्रीच्या मनात वारंवार आत्महत्येचा विचार आला. मात्र, जेव्हा अभिनेत्री तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून जात होती, तेव्हाच किशोर कुमार तिच्या आयुष्यात आले. लीना आणि किशोर कुमार यांच्यात २० वर्षांचे अंतर होतं आणि किशोर कुमार यांची तीन लग्न झाली होती.
Ghabadkund Movie : मराठीत पहिल्यांदाच हॉरर-थ्रिलर युनिव्हर्स, ‘घबाडकुंड’ची टीम मटा कट्टावर
‘प्यार अजनबी है’ या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान किशोर कुमार लीना यांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यांनी अभिनेत्रीला लग्नाची मागणी घातली, पण पहिल्या पतीच्या निधनामुळे ती लग्नाला तयार नव्हती. किशोर कुमार आपल्या निर्णयावर ठाम राहिले. अखेर लीना लग्नासाठी तयार झाल्या. मात्र, लीना यांचं कुटुंब या निर्णयामुळे नाराज होतं, कारण किशोर कुमार अभिनेत्रीपेक्षा जवळपास २० वर्षांनी मोठे होते आणि त्यांच्या आधीच तीन पत्नी होत्या. अभिनेत्रीच्या कुटुंबाला आपल्या मुलीचीही तीच गत होईल अशी भीती वाटत होती. तरीही, त्यांचं लग्न झालं आणि हळूहळू लीना यांच्याच्या कुटुंबानं तिला स्वीकारलं.
Mandar Jadhav : चार-पाच वर्ष काम नाही, डिप्रेशनमुळे वाईट विचार, पण नाही मानली हार; मंदार जाधवनं सांगितला कठीण काळ
किशोर कुमार आणि लीना चंदावरकर यांचं लग्न १९८० मध्ये झालेलं, पण १९८७ मध्ये, किशोर कुमार यांचं वयाच्या ५८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, तेव्हा अभिनेत्रीवर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला. त्यावेळी अभिनेत्री ३७ वर्षांची होती.

