![]()
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. 11 ते 15 जुलै या कालावधीत पालखी मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. पालखी सोहळ्याचे प्रस्थान 7 जुलै 2026 रोजी श्री क्षेत्र देहू येथून होणार आहे. 12 जुलै रोजी पहाटे 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत लोणीकाळभोर ते यवत (यवत मुक्काम) या मार्गावर वाहतूक बदल लागू राहील. पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने वाघोली-केसनंद-राहू-पारगाव-चौफुला या मार्गाचा वापर करतील. तसेच, सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे येणारी वाहने चौफुला-पारगाव-राहू-केसनंद-वाघोली या मार्गाचा वापर करतील. 13 जुलै रोजी पहाटे 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत यवत ते वरवंड (वरवंड मुक्काम) या दरम्यान वाहतूक वळवण्यात येईल. पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने हडपसर-मगरपट्टा-लोणीकंद-केसनंद-वाघोली-राहू-पारगाव-न्हावरे-काष्टी-दौंड-कुरकुंभ मार्गे जातील. सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे येणारी वाहने कुरकुंभ-दौंड-काष्टी-न्हावरे-पारगाव-राहू-वाघोली-पुणे या मार्गाचा वापर करतील. 14 जुलै रोजी पहाटे 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत वरवंड ते उंडवडी (बारामती तालुका, उंडवडी मुक्काम) या मार्गावर वाहतूक बदल असेल. पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे जाणारी वाहतूक चौफुला-पारगाव-न्हावरे-काष्टी-दौंड-कुरकुंभ या मार्गाचा वापर करेल. याच दिवशी, म्हणजेच 14 जुलै रोजी पहाटे 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत बारामती ते पाटस आणि बारामती ते दौंड हे रस्ते बंद राहतील. बारामतीकडे जाणारी वाहतूक भिगवण मार्गे वळवण्यात येईल, तर बारामतीकडून येणारी वाहने भिगवण मार्गे सोलापूर-पुणे रस्त्यावर येतील. पाटस ते बारामती जाणारी वाहने पाटस-चौफुला-सुपा-लोणीपाटी-बारामती या मार्गाचा वापर करतील. 15 जुलै रोजी पहाटे 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत उंडवडी ते बारामती (बारामती मुक्काम) या प्रवासादरम्यान बारामती ते पाटस आणि बारामती ते दौंड हे रस्ते बंद असतील. या कालावधीत बारामतीकडे जाणारी वाहतूक भिगवण मार्गे वळवण्यात येईल आणि बारामतीकडून येणारी वाहने भिगवण मार्गे सोलापूर-पुणे रस्त्यावर येतील. 16 जुलै रोजी पहाटे 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत बारामती ते सणसर (सणसर मुक्काम) या मार्गावर जंक्शन ते बारामती हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील. वालचंदनगर आणि इंदापूरकडून येणारी वाहतूक जंक्शन येथून कळसमार्गे बारामती-अष्टीकडे वळवण्यात येईल. बारामतीकडून येणारी वाहतूक भिगवण-कळसमार्गे जंक्शनकडे जाईल. 17 जुलै रोजी पहाटे 2 वाजल्यापासून ते 18 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सणसर ते निमगाव केतकी (निमगाव केतकी मुक्काम) या मार्गावर वाहतूक बदल असेल. बारामतीकडून इंदापूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने बारामती-कळंब-बावडा-इंदापूर किंवा बारामती-भिगवण-इंदापूर या पर्यायी मार्गांचा वापर करतील.
Source link
पालखी सोहळ्यामुळे पुणे ग्रामीणमध्ये वाहतूक बदल:जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी; 11 ते 15 जुलै दरम्यान पर्यायी मार्ग
