Latur Deoni Farmer Gaikwad Couple Gave Sick Bull to Sit Down while Working; शेतकरी महिलेनं नांगर ओढला, मदतीसाठी सरकारने बैल दिला; पण तोही आजारीच निघाला, जुंपल्यानंतर काय घडलं?
Latur Deoni Farmer Gaikwad Couple Gave Sick Bull to Sit Down while Working; शेतकरी महिलेनं नांगर ओढला, मदतीसाठी सरकारने बैल दिला; पण तोही आजारीच निघाला, जुंपल्यानंतर काय घडलं?
Latur Farmer Gaikwad Couple Bull Video : लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी येथील गायकवाड या शेतकरी दाम्पत्याला देण्यात आलेला बैल आजारी असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.
देवणी काशिनाथ गायकवाड यांना आजारी बैल दिला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ऋषिकेश होळीकर, लातूर : लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांचा एक बैल वीज कोसळून मृत्युमुखी पडला. त्यानंतर एका बैलाच्या जागी पत्नीला औताला जुंपून शेतीची मशागत करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली.
सुदृढ बैल देण्याचे आदेश
या घटनेची सरकारने दखल घेत पशुसंवर्धन विभागाने 10 जून रोजी तातडीने मदत म्हणून त्या शेतकऱ्याला एक बैल उपलब्ध करून दिला. मात्र, मदतीसाठी दिलेला हा बैल दोनच दिवसांत शेतातील मशागतीदरम्यान खाली बसला. पशुवैद्यकीय तपासणीत तो आजारी असल्याचं निष्पन्न झालं. परिणामी मदत मिळण्याऐवजी शेतकऱ्यावर आता त्या बैलाच्या उपचाराचा खर्च करण्याची वेळ आली आहे. यामुळे प्रशासनाने तत्काळ मदतीच्या नावाखाली आजारी बैल शेतकऱ्याच्या गळ्यात मारल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुदृढ बैल देण्याचे आदेश दिले असल्याची माहिती समोर आली आहे.
शेतात काही दिवसांपूर्वी त्यांचा एक बैल वीज पडून मृत्युमुखी पडला. खरीप हंगामातील पेरणीची वेळ सुरू असताना दुसरा बैल खरेदी करण्याइतकी आर्थिक परिस्थिती नसल्यानं अखेर कुटुंबानं स्वतःच शेतीची मशागत करण्याचा निर्णय घेतला. यावेळी काशीनाथ गायकवाड नांगर हाकत असताना त्यांच्या पत्नी हौसाबाई काशीनाथ गायकवाड यांनी दुसऱ्या बैलाच्या जागी औत ओढण्याचे काम केलं. वृद्धापकाळातही शेती वाचवण्यासाठी या दाम्पत्याचा संघर्ष सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यातील कठोर वास्तव अधोरेखित करणारं हे दृश्य सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या गायकवाड कुटुंबाला मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती, त्यानंतर त्यांना एक बैल उपलब्ध करुन देण्यात आला होता. मात्र, तो बैल देखील आजारी असल्याचं आता तपासात निष्पन्न झालं आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा