Latur Bodhe Nagar Two Children Died after Falling into a Water; खेळताना अचानक तोल गेला, पाणी साठवलेल्या खड्ड्यात दोन चिमुकल्या निष्पापांचा जीव गेला; आई-वडिलांचा आक्रोश
Latur Bodhe Nagar Two Children Died after Falling into a Water; खेळताना अचानक तोल गेला, पाणी साठवलेल्या खड्ड्यात दोन चिमुकल्या निष्पापांचा जीव गेला; आई-वडिलांचा आक्रोश
Latur Two Children Drowned to Death : लातूरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका पाण्याच्या खड्ड्यात दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेनं शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
लातूर बोधे नगर मुलांचा बुडून मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ऋषीकेश होळीकर, लातूर : लातूर शहरातील बोधे नगर परिसरात खेळता खेळता तोल गेल्यानं पाणी असलेल्या खड्ड्यात पडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर नागरिकांनी लातूर शहर महानगरपालिकेच्या दुर्लक्षावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच दोन्ही चिमुकल्यांच्या कुटुंबियांनी लेकरांना पाहताच एकच आक्रोश केलाय.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, बोधे नगर येथील रामला इंडस्ट्रीजच्या पाठीमागील मोकळ्या जागेत राजू तोडके हे पाणी पुरवठ्याचा व्यवसाय करीत होते. या ठिकाणी मोठ्या खड्ड्यात बोरवेलचे पाणी साठवून ते छोट्या टँकरच्या माध्यमातून लातूर शहरातील विविध हॉस्टेल व इतर भागात पुरवठा करण्यात येत होता. गेल्या 10 वर्षांपासून हा पाणीसाठा याच ठिकाणी केला जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. Accident News: दोन महिन्यांपूर्वी लग्न, पण भीषण अपघातात तरुणाच्या मृत्यूने संसार उद्ध्वस्त; वाढदिवशीच पाच वर्षीय नीरजचाही दुर्दैवी अंत दरम्यान, संबंधित खड्डा हा परिसरातील रस्त्यालगतच असल्यामुळे नागरिकांसाठी तो धोकादायक ठरत होता. विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी लातूर शहर महानगरपालिकेकडे तक्रारी करून या खड्ड्याभोवती सुरक्षितता उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र महापालिकेकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
महापालिकेच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह
अशातच खेळत असताना दिव्या नवनाथ उबाळे (वय 6 वर्ष) व कार्तिक भरत कांबळे (वय 7 वर्ष) हे दोघे त्या पाण्याच्या साठवण खड्ड्यात पडले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत दोघांना बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केलं. या घटनेनंतर बोधे नगर परिसरात शोककळा पसरली असून, संतप्त नागरिकांनी महापालिकेच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ‘वेळीच तक्रारींची दखल घेतली असती तर दोन निष्पाप जीव वाचले असते,’ अशी भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. Nagpur News: बारा वर्षांचा संसार, पदरात 2 लेकरं, बायको घर सोडून गेली; कौटुंबिक कलहातून पतीचा टोकाचा निर्णय दरम्यान, या घटनेची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी तसेच शहरातील अशा धोकादायक पाणीसाठ्यांची तातडीने पाहणी करून सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा