Latur Accident: लातूर-औसा मार्गावरील बुधोडा गावाजवळ भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ३ महिलांचा मृत्यू झाला असून, १७ जण जखमी झाले आहेत.

लातूर-औसा मार्गावरील बुधोडा गावाजवळ हा अपघात घडला. या दुर्घटनेत तीन महिलांचा मृत्यू झाला असून, १७ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुलांसह महिला आणि पुरुषांचा समावेश असून चार जणांची प्रकृती गंभीर आहे. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील आरळी येथील भाविक एमएच-१२-सीआर-८०७७ क्रमांकाच्या क्रूझरमधून देवदर्शनासाठी जात असताना एमएच-२४-एडब्ल्यू-३६९१ क्रमांकाच्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली.
Nagpur Crime: अंगावर तर्रीचे शिंतोडे उडाल्यानं डोक्यात सणक; तीन महिलांसह 7 जणांनी तरुणाला संपवलं, नागपुरात खळबळ
धडकेमुळे क्रूझरचा मागील भाग चिरडला गेला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करून जखमींना बाहेर काढून उपचारांसाठी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेत रेश्मा पाटील (वय २९) व सरोजा पतगे (वय ४२) यांच्यासह अन्य एका महिलेचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सासू-सुनेचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, अपघाताच्या वेळी कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, पोलिसांकडून याबाबत तपास सुरू आहे.
Nagpur Crime: नागपुरात महिलेच्या जबरदस्ती धर्मांतराचा प्रयत्न; VIDEO व्हायरल करायची धमकी देऊन 3 लाख उकळले, वर्गमित्रासह दोघांना अटक
विहिरीत ‘पिकअप’ कोसळून ८ ठार
माळशिरस तालुक्यात झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. अपघाताची घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे त्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात रविवारी पिकअप वाहन विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात सहा जण जखमी झाले. म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ सुतार टेकडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत हे वाहन कोसळले.

