Headlines

Ladki bahin yojana many womens applications disqualified assurance from minister girish mahajan to resolve technical issues; लाडकी बहीण योजनेतून लाखो महिला अपात्र, पुन्हा समावेश होणार की नाही? मंत्री गिरीश महाजनांकडून महत्त्वाची माहिती


म. टा. प्रतिनिधी, जळगाव: राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अर्जांच्या छाननीमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला अपात्र ठरल्याच्या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर ‘ही केवळ तांत्रिक अडचण असून, ती दूर करण्यात येईल. महिलांनी काळजी करू नये, अशी ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत ई-केवायसी आणि कागदपत्रांच्या कडक पडताळणीनंतर तब्बल ७० ते ८० लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरले. या मोठ्या छाननी प्रक्रियेनंतर राज्यातील पात्र लाभार्थी महिलांची अंतिम संख्या १ कोटी ६६ लाखांवर आली आहे. या सर्व घडामोडींवर मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिले.

महाजन म्हणाले, ‘अनेक महिलांचे अर्ज अपात्र ठरण्यामागे काही राजकीय हेतू नसून ही केवळ ‘तांत्रिक अडचण’ आहे. अनेक महिलांना कागदपत्रे जोडण्यात किंवा ई-केवायसी पूर्ण करण्यात अडचणी आल्या आहेत. आम्ही यासाठी आधीही मुदतवाढ दिली होती. ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी शासन स्तरावर नक्कीच सकारात्मक निर्णय घेतला जाईल.’

‘मुख्यमंत्री घेणार योग्य निर्णय’

गिरीश महाजन म्हणाले की, ‘ज्या महिलांच्या अर्जांमध्ये तांत्रिक चुका आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य निर्णय घेतला जाईल.’

विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर

काही विरोधक हे केवळ ‘बोलबच्चन’ नेते आहेत. जनतेमध्ये त्याचा प्रभाव उरलेला नाही. निवडणुकीच्या भीतीने ते केवळ आरोप करत आहेत. मात्र, जनतेचा विश्वास सरकारवरच असल्याचे त्यांनी सांगितले.

‘अपात्र लाभार्थ्यांना पैसे वाटत होते का?’ : सुळे

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची कमालीची घटलेली संख्या हा चिंतेचा विषय असून, नागरिकांच्या कष्टाच्या कररूपी पैशांतून ही योजना चालवली जाते. त्यामुळे गेली वर्ष-दीड वर्ष सरकार अपात्र लाभार्थ्यांनाच लोकांचा पैसा वाटत होते का, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी केले.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत