Kangna Sharma : अभिनेत्री कंगना शर्मानं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिच्या बहिणीचा हृदयद्रावक प्रसंग सांगितला आहे.

कंगनानं सांगितली हृदयद्रावक कहाणी
कंगना शर्मा म्हणाली, ‘मला नंतर कळलं की ज्या घरी माझ्या बहिणीचं लग्न झालं होतं, ते देहविक्रीचं ठिकाण होतं. आमच्याकडे लग्नानंतर पहिल्या रात्री नवरा आणि बायकोला एकत्र झोपण्याची परवानगी नसते. दुसऱ्या दिवशी, जेव्हा मुलगी लग्नानंतर तिच्या सासरच्या घरी परत येते, तेव्हा ती त्यांची पहिली रात्र असते. म्हणून, मी माझ्या बहिणीसोबत लग्नासाठी तिच्या सासरच्या घरी गेले होते. मी १४ वर्षांची होते आणि रात्री बाथरूमला जाण्यासाठी उठले. मी पाहिलं की, माझ्या बहिणीच्या तोंडात कापड कोंबलेलं होतं, तिचे हात बांधलेले होते. ती पहिली रात्र होती. मी घाबरले होते. मी कोणालाही सांगितलं नाही. माझी बहीणही घाबरली होती. तिनं मला तिला कसंही करून घरी सोडायला सांगितलं. मी काहीही करू शकले नाही. मी लहान होते आणि मला काहीच समजत नव्हतं.’
Vijay Nikam : ‘मी आर्थिकदृष्ट्या शून्यावर आलो’, सिनेमासाठी विकली जमापुंजी, डोक्यावर लाखोंचं कर्ज; मराठी अभिनेत्यानं सांगितला कठीण काळ
कंगना म्हणाली की, ‘माझ्या बहिणीनं घरी येऊन वडिलांना सांगितलं की, तिला सासरी राहायचं नाहीये. त्यांच्या घरी वेश्याव्यवसाय चालतो. माझ्या वडिलांनी तिला कानशिलात लगावली. तिच्या नाकातून खूप रक्त आलं. बाबा म्हणाले, ‘आता तुझं लग्न झालं आहे’ म्हणून ती परत गेली. आठवडाभर तिचा काहीच पत्ता नव्हता. त्या वेळी एसटीडी फोन वापरात होते. मी माझ्या आईला म्हणाले, आई, घरी सगळं ठीक नाहीये. मला बरं वाटत नाहीये. मी तिला काही सांगितलं नाही. आठवडाभर आम्ही माझ्या बहिणीला फोन करत राहिलो, पण काहीच उपयोग झाला नाही.
Suresh Oberoi : ‘मित्राच्या सांगण्यावरून मी भाजपमध्ये प्रवेश केलेला, राजकारणात खोटेपणा जाणवत होता’, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं वक्तव्य
‘माझी बहीण घरापासून दूर दुसऱ्या घरी पत्र पाठवायची. त्या पत्रात लिहिलेलं, ‘मला वाचवा. माझ्या घरच्यांना सांगा, मला वाचवा.’ जेव्हा माझे वडील बहिणीच्या सासरी गेले, तेव्हा त्यांना घरातून हाकलून देण्यात आलं. जेव्हा त्यांना तिथे काहीतरी हालचाल दिसली, तेव्हा ते आत गेले. माझी बहीण म्हणाली, तिला तिथून कसंही करून बाहेर काढा. माझी बहीण इतक्या मोठ्या मानसिक धक्क्यात होती की ती वर्षभर अंथरुणातून उठली नाही. नंतर आम्हाला कळलं की, त्यांनी तिला गुंगीची औषधं दिली होती.’
Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड
‘माझ्या वडिलांनी बहिणीला घटस्फोट घ्यायला सांगितला. पण नंतर तिचं पुन्हा दुसरं लग्न लावून दिलं. त्यांनी एक रुपया देऊन एका मिठाईवाल्याशी बहिणीचं लग्न ठरवलं.माझी बहिण तयार नव्हती. माझ्या वडिलांनी बहिणीला शिवीगाळ करायला सुरुवात केली. जेव्हा माझ्या बहिणीचं मिठाईवाल्यासोबत लग्न झालं, तेव्हा त्याने पहिल्याच रात्री सुरुवात केली आणि म्हणाला, ‘तू हे आधीच्या माणसासोबत केलं आहेस. जर तू त्याच्यासोबत केले आहेस, तर इथेही कर.’ माझी बहीण म्हणाली, ‘मला थोडा वेळ द्या. मला शारीरिक स्पर्शाची भीती वाटते.’ दोन वर्षांच्या आत, ती इतकी आजारी पडली की तिला टीबी आणि कॅन्सर झाला, आणि आम्हाला त्याची कल्पनाही नव्हती. तिला काहीही दिसत नव्हतं. माझ्या बहिणीला वाचवू न शकल्याची खंत मला आजही वाटते.’ असं कंगना शेवटी म्हणाली. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये कंगना शर्मा बोलत होती.

