Headlines

maharashtrachi hasyajatra fame vanita kharat shares incident of scam happened with her


Vanita Kharat Scam : मराठी अभिनेत्री वनिता खरातसोबत स्कॅम घडला असून त्याबद्दल तिनं सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं आहे. तसेच चाहत्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

Vanita Kharat Video
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – आजकाल सामन्यांपासून ते कलाकारांसोबतही स्कॅम होत आहेत. याबद्दल कलाकार सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करतात. अशातच आता ‘ महाराष्ट्राची हास्यजत्रा ‘ फेम वनिता खरातसोबत एक स्कॅम घडला असून त्याबद्दल अभिनेत्रीनं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत घडलेला प्रकार सांगितला आहे.

वनिता खरातनं सांगितला प्रसंग

वनिता खरात म्हणाली की, ‘काल माझ्यासोबत एक गोष्ट घडली. एक स्कॅम झाला. ते तुमच्यासोबत होऊ नये, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतेय. माझं एक पार्सल येणार होतं, मला तसाच फोन आलेला. त्यांनी सांगितलं की, ‘तुमचं पार्सल येणार आहे, पण डिलिव्हरी बॉयला तुमचा पत्ता सापडत नाहीये. तर तुमचा पत्ता दिलेल्या नंबरवर पाठवा.’ तर मी त्याला म्हटलं, मी जिथून पार्सल मागवलंय, तिथे माझा पत्ता आधीच दिलेला आहे, त्यामुळे असं कधी होऊ शकत नाही.’

Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड

वनिता पुढे म्हणाली की, ‘पण त्याने दोन-तीन वेळा फोन केला. मग मी त्याने जो नंबर सांगितलेला तो लावला आणि काही सेकंदमध्येच माझं WhatsApp हॅक झालं, माझ्या फोनमधून लॉगआउट झालं. त्याने माझे कॉल त्याच्या नंबरवर फॉरवर्ड केले. मला फोन येणं बंद झालं आणि माझ्या WhatsApp वरून माझ्या संपर्कातल्या सगळ्यांना असा मेसेज गेला की, ‘मी खूप अडचणीत आहे, तुम्ही मला मदत कराल का? मला एवढे-एवढे पैसे पाठवा. ६२,००० पाठवा.’ काहींनी पैसे पाठवले, त्यामुळे खूप वाईट गोष्ट घडली.”मुळात ‘ब्लूडार्ट’ ही मोठी कुरिअर कंपनी आहे, त्यावर विश्वास ठेवतो. पण, त्यांच्या कंपनीच्या नावाने स्कॅम होतोय, तर त्यांनी यावर लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला असे काही फोन आले आणि तुम्हाला संशय आला तर लगेच तक्रार करा. मदतीसाठी मेसेज आले, तर आधी तपासून घ्या. खूप काळजी घ्या, कधीही स्कॅम होऊ शकतो. आता माझं WhatsApp रिकव्हर झालंय, अशा फोन आणि मेसेजेसना फसू नका.’ असं वनितानं शेवटी म्हटलं आहे. वनितानं ही पोस्ट शेअर करत ‘Scam Alert’ असं लिहिलं असून ‘Bluedart’ या कुरिअर कंपनीला टॅग केलं आहे.