Headlines

Kangana Ranaut : ‘ते लोक स्वतःला झुरळ म्हणतात अन् झुरळं गटारातूनच येतात’; कंगनाचं ‘जनरेशन गटर’ वर स्पष्टीकरण


Kangana Ranaut On Gen Z : कंगना रणौतनं काही दिवसांपूर्वी जेन झींना ‘जनरेशन गटर’ म्हटलेलं. यावर आता अभिनेत्रीन स्पष्टीकरण दिलं आहे.

Kangana ranaut On Gen Z
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – खासदार आणि अभिनेत्री बनलेल्या कंगना रणौतनं जेन झींना ‘जनरेशन गटर’ म्हटलेलं. या वक्तव्यामुळे कंगनाला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता, अभिनेत्रीनं तिच्या या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

कंगना रणौतचं ‘जनरेशन गटर’ वक्तव्यावर स्पष्टीकरण

बुधवारी एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेशी बोलताना कंगना रणौतनं सांगितलं की, तिचं वक्तव्य विशेषतः स्वतःला कॉकरोच म्हणवणाऱ्यांना उद्देशून होतं. अभिनेत्री म्हणाली, ‘लोक स्वतःला कॉकरोच म्हणवतात आणि आपण म्हणतो की, झुरळं गटारातून बाहेर येतात, यात काय चुकीचं आहे? माझा मुद्दा काय आहे? जर लोक स्वतःला झुरळं म्हणत असतील आणि आपण म्हणतो की, गटार हे त्यांचं घर आहे, तर त्यांना मी बोललेल्याचं वाईट का वाटावं?’

Maharashtra TimesPriya Rajvansh : दिग्दर्शकावर प्रेम करणं पडलं महागात, संपत्तीमुळे अभिनेत्री मृत्यूच्या दाढेत, बॉयफ्रेंडच्याच बंगल्यात सापडली बॉडी; काय घडलेलं?
‘मी स्वतःला नक्कीच झुरळ मानत नाही. जर कोणी म्हणालं की मी गटारात राहते, तर मी ते नाकारेन. पण जर कोणी स्वतःला झुरळ म्हणत असेल, तर साहजिकच ते गटारातच राहत असतील, आणि दुसरं कुठे? पण मी सर्व तरुणांबद्दल बोलत होते, असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. मी विशेषतः काही लोकांबद्दल किंवा काही महिलांबद्दल बोलत होते’ असंही कंगना पुढे म्हणाली.

Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड

काय घडलेलं नेमकं?

कंगनाने जंतर मंतर येथील ‘जेन झी’च्या आंदोलनावर जोरदार टीका केली होती. कंगनानं लिहिलेलं की, ‘जेन झी’च्या आंदोलनाचे हे व्हिडिओ किळसवाणे आहेत. ज्या प्रकारे ते बोलतात आणि जी भाषा वापरतात… मी माझ्या आयुष्यात इतका विचित्रपणा कधीच पाहिला नाही… मी त्यांना ‘जनरेशन गटर’ म्हणते. त्यांच्यापैकी काहींकडे व्यवस्थेला देण्यासारखं काहीच नाही. ते अभ्यासात चांगले नाहीत…तुम्ही स्वतःला झुरळ म्हणता आणि तुम्ही तसेच दिसता आणि वागता… त्यात कोणताही फरक नाही. या रील्सनी मला खूप अस्वस्थ केले आहमुळे मी खूप अवस्थ झाले आहे, मला स्वतःला सावरण्याची आणि डिजिटल डिटॉक्स करण्याची गरज आहे.’

Maharashtra TimesAnupama Parameswaran : कधी चांगला वागायचा तर कधी हैवान, बॉयफ्रेंडकडून शारीरिक, मानसिक छळ; लोकप्रिय अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
दरम्यान, कंगना रणौतच्या कामाबद्दल बोलायचं तर अभिनेत्री शेवटची ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटात दिसली होती. मनोज तापारिया दिग्दर्शित हा चित्रपट, २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या कामा हॉस्पिटलमधील नर्सेस आणि कर्मचाऱ्यांच्या सत्य कथेवर आधारित आहे. हा चित्रपट १४ ऑगस्टपासून ZEE5 वर प्रदर्शित होईल.