Headlines

Kangana Ranaut : ‘गटारातून कोण आलंय, हे फक्त गटारातून आलेलेच ओळखू शकतात’, काँग्रेस खासदाराचं कंगनाला सडेतोड प्रत्युत्तर


Renuka Chowdhury : काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी कंगना रणौतच्या मुलींबद्दलच्या वक्तव्यावर सडेतोड उत्तर दिलं आहे.

Kangana Ranaut
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाची लोकसभा खासदार कंगना रणौतनं सीजेपीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या महिला आणि मुलींबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कंगना म्हणाली , या मुली एक चांगली गृहिणीसुद्धा बनू शकत नाहीत. आता काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी कंगनाच्या या वक्तव्यावर टीका केली आहे.

रेणुका चौधरी यांनी कंगना रणौतवर निशाणा साधला

काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रेणुका चौधरी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान संसद परिसरात माध्यमांशी बोलताना कंगना रणौतच्या वक्तव्यावर टीका केली. रेणुका म्हणाल्या की, ‘मी विचारते की गृहिणी होण्यासाठी तिच्याकडे कोणतं प्रमाणपत्र किंवा पात्रता आहे. ती एक खूप चांगली गृहिणी होऊ शकते असं कोणी म्हटलं? गटारातून कोण आलं आहे आणि कोण नाही, हे फक्त तेच ओळखू शकतात जे गटारातून आले आहेत’

CJP Protest मध्ये २८०० गुन्हेगार, दिल्ली पोलिसांनी Face Scan पद्धतीनं ओळख पटवली, आंदोलन पेटणार ?

रेणुका पुढे म्हणाल्या, ‘एक महिला अशा प्रकारे भाष्य करते आणि तिला वाटतं की, यामुळे तिला संसदेत सरकारकडून प्रशंसा आणि पाठिंबा मिळेल. भाजप महिलांसोबत काय करतं, हे लवकरच स्पष्ट होईल. जर तुम्ही संसदेत येऊन असं बोलत असाल, तर आम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा करू शकतो? आम्ही तुमच्याकडून शिकत आहोत. आम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील.’
Maharashtra TimesRaja Chaudhary : ‘लग्नानंतरही एका अभिनेत्यासोबत तिचं अफेअर होतं’, श्वेता तिवारीबद्दल एक्स पती राजा चौधरीचा धक्कादायक दावा

कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मुली आणि महिलांबद्दल अपमानकारक पोस्ट लिहिली होती. अभिनेत्रीनं लिहिलं की, स्वतंत्र करिअर करणाऱ्या महिलांचं अनुकरण करू इच्छिणाऱ्या तरुण हिंदू महिलांसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. स्वतंत्र करिअर करणाऱ्या महिला आपल्या जबाबदाऱ्या सांभाळतात आणि त्या आपल्या आई-वडिलांच्या जीवावर जगत नाहीत. दुसरीकडे, काही महिला आई-वडिलांच्या पैशांवर जगतात, ड्रग्स घेतात, दारू पितात आणि अनेक पुरुषांशी संबंध ठेवतात. प्रत्यक्षात स्वतंत्र नसतानाही ‘स्वतंत्र जीवन’ जगण्यासाठी सतत भांडत राहतात. पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करणाऱ्या भारतीय महिलांच्या नव्या पिढीला मी ‘जनरेशन गटर’ (गटारातील पिढी) असं संबोधते.