Kalyan Mamnoli Road Murder Two office colleagues held for killing co-worker in unwanted physical relation Crime News; चल आम्ही तयार आहोत समलिंगी संबंधांना! रमेशला जंगलात बोलावलं, राजेश-प्रथमेशचा वेगळाच गेम, कल्याणमधील खुनाचा उलगडा
Kalyan Mamnoli Road Murder Two office colleagues held for killing co-worker in unwanted physical relation Crime News; चल आम्ही तयार आहोत समलिंगी संबंधांना! रमेशला जंगलात बोलावलं, राजेश-प्रथमेशचा वेगळाच गेम, कल्याणमधील खुनाचा उलगडा
Crime News : राजेश नकार देत असतानाही त्याच्याशी समलिंगी संबंध ठेवण्यासाठी रमेश त्याच्यावर वारंवार दबाव आणत असल्याने दोघांनी मिळून त्याचा काटा काढला
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
कल्याण : कल्याण-अहिल्यानगर मार्गावर मामनोली गावाजवळील जंगलात एका अज्ञात व्यक्तीची बॉडी कुजलेल्या अवस्थेत आढळल्याच्या घटनेला जवळपास एक महिना उलटला. त्यानंतर मयत व्यक्तीच्या कार्यालयातील दोन सहकाऱ्यांना त्याच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. कल्याण तालुका पोलिसांनी ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ही कारवाई केली.
महिन्यापूर्वी शव सापडले
मयत ४२ वर्षीय रमेश (नाव बदलले आहे) हे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील देवगावचे रहिवासी होते. ते एका खाजगी कंपनीच्या हाऊसकीपिंग विभागात काम करत होते. २८ जून रोजी त्यांचे कुजलेल्या अवस्थेतील शव सापडले; त्यानंतर पोलिसांनी हत्या आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी सांगितले की, बॉडी कुजलेल्या अवस्थेत असली, तरी तपास पथकाला त्याचे कंपनीतील ओळखपत्र सापडले होते, त्यामुळे त्याची ओळख पटवणे शक्य झाले. त्यानंतर त्यांनी घटनास्थळ आणि मृताच्या कामाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे व इतर माहितीच्या आधारे तपास केला.
तपासादरम्यान पोलिसांना मयत व्यक्तीच्या दोन सहकाऱ्यांविषयी माहिती मिळाली. राजेश (वय २४, नाव बदलले आहे) त्याच कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत होता, तर प्रथमेश (वय २८, नाव बदलले आहे); हे दोघेही मुरबाडचे रहिवासी आहेत.
लक्ष्मण हाके जंतर-मंतरवर जाणार, वांगचुक-दिपकेंना पाठिंबा देत भाजपविरोधात भूमिका
समलिंगी शारीरिक संबंधांसाठी दबाव
पोलिसांच्या माहितीनुसार, रमेश हा समलिंगी होता. राजेश नकार देत असतानाही त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी रमेश त्याच्यावर वारंवार दबाव आणत असल्याचा आरोप आहे. रमेशच्या या वागणुकीमुळे राजेश अस्वस्थ झाला होता आणि त्याने प्रथमेशच्या मदतीने रमेशची हत्या करण्याचा कट रचला, असा दावा पोलिसांनी केला आहे.
लैंगिक संबंधाच्या आमिषाने भुलवलं
पोलिसांनी केलेल्या आरोपानुसार, आरोपी राजेश आणि प्रथमेश यांनी लैंगिक संबंधांचे आमिष दाखवून रमेशला एका निर्जन जंगलात बोलावले. तिथे पोहोचल्यावर राजेशने रमेशच्या डोक्यात लोखंडी सळईने प्रहार करून त्याचा गळा चिरला, तर प्रथमेशने या हत्येत त्याला मदत केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शव जंगलात टाकण्यापूर्वी या दोघांनी त्याचे सोन्याचे दागिने काढून घेतले. Pune Crime : पुण्यात तरुणाला संपवलं, आरोपींची बोनेटला बांधून धिंड; लेक गमावलेल्या माऊलीचा संताप, चपलांनी बदडण्याचा प्रयत्न दोन्ही आरोपींना अटक करुन स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले; न्यायालयाने त्यांना २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुरू आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा