Headlines

J&K Statehood: काश्मिरी कसरत – omar abdullah announces delhi march for j&k statehood on 20 july 2026


Omar Abdullah Announces 20 July Delhi Protest: जम्मू-काश्मीरमध्ये सन २०१९ नंतर दहशतवाद्यांचे चार-पाच मोठे हल्ले झाले हे खरे; मात्र आधीच्या तुलनेत हल्ल्यांची संख्या घटली आहे, हे मान्य करायलाच हवे.

omar abdullah
जम्मू काश्मीर(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ जणांनी प्राण गमावल्यानंतर, ‘जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी करण्याची, त्यावर राजकारणाची ही वेळ नाही,’ अशी संयत प्रतिक्रिया मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नोंदवली होती. त्याच ओमर यांनी, ‘झाले तेवढे पुरे झाले. आता आमच्या राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी येत्या २० जुलै रोजी दिल्लीत जंतरमंतर येथे आम्ही निदर्शने करणार आहोत,’ ही घोषणा आक्रमक शैलीत रविवारी केली. अर्थात, हे होणारच होते.

जम्मू-काश्मीरसाठीचे ३७० कलम केंद्रातील मोदी सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी रद्द केल्यानंतर २०२४मध्ये तेथे विधानसभा निवडणुका होऊन ओमर अब्दुल्ला यांचे सरकार आले; मात्र राज्यास पूर्ण राज्याचा दर्जा नसल्याने अनेक बाबतींत या सरकारचे हात बांधलेले आहेत. पोलिस व प्रशासकीय बदल्या करायच्या, काही महत्त्वाची विधेयके मंजूर करायची तर नायब राज्यपाल – म्हणजेच एका अर्थाने केंद्र सरकारची मंजुरी गरजेची. त्यामुळेच प्रशासकीय व अर्थातच राजकीय कारणांसाठी ओमर यांनी हा पवित्रा घेणे अगदीच अपरिहार्य. लोकशाहीच्या मूल्यांच्या अंगाने विचार करता ही मागणी अगदीच योग्य असली तरी जम्मू-काश्मीरबाबत सर्वांत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो तो अर्थातच सुरक्षेचा. ही सुरक्षा सीमेवरची, तशीच राज्यातील अंतर्गत देखील.

केंद्रीय सुरक्षा दलांचे हे मोठे यशच. या पार्श्वभूमीवर पूर्ण राज्याचा दर्जा दिल्यास सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी राहून नागरिकांच्या जीविताला काही धोका निर्माण होणार नाही, हे सर्वोच्च प्राधान्याने बघणे गरजेचे आहे. विशेषतः शेजारच्या हिंसाखोर पाकिस्तानमधील अस्थिर परिस्थिती पाहता ही गरज अधिक ठळकपणे अधोरेखित होते. त्यामुळे ओमर यांची मागणी न्याय्य असली तरी त्यावर तातडीने काही निर्णय होणे कठीण.

तसेच, या मागणीची तीव्रता वाढून त्यास अनुचित वळण लागणार नाही, ही काळजी केंद्र व ओमर या दोन्ही सरकारांना घ्यावी लागेल. एका रीतीची ती कसरतच, पण त्यास पर्याय नाही. या राज्यातील तणाव वाढणे कुणालाच परवडणार नाही. हे भान सारेच बाळगतील, ही आशा.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा