Headlines

James Dyson Success Story; 5000 पेक्षा जास्त वेळा नाकारली आयडिया, तरी नाही मानली हार; पठ्ठ्याने एका छोट्या समस्येतून उभारलं 1,300 कोटींचे साम्राज्य

World’d Most Stubborn Man: आजच्या काळात सर जेम्स डायसन यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. सर जेम्स डायसन यांना अब्जाधीश उद्योगपती मानले जाते, पण यशाची गोड चव चाखण्यासाठी त्यांना अनेक आव्हाने आणि नाकारांना सामोरे जावे लागले.

Sir James Dyson Success Story
Success Story: अपयश किती वेळा सहन करू शकतो आपण? 10 वेळा? 20 वेळा? किंवा 100 वेळा? पण विचार करा की एखादा माणूस 5127 वेळा अपयशी ठरला तर? ही केवळ संख्या नाही, अथक जिद्दीची ओळख आहे. आपल्याला रात्रीतून यश मिळतं असं अनेकजण गृहीत धरतात. पण, जगप्रसिद्ध ब्रिटिश संशोधक सर जेम्स डायसन यांचा किस्सा तुमचा गैरसमज पूर्णपणे मोडीत काढेल. सर जेम्स डायसन यांची यशोगाथा एखाद्या चमत्कारिक कल्पनेबद्दल नाही, तर एका सामान्य दैनंदिन संघर्ष आणि समस्येचे मुळापासून उघडून काढण्याच्या दृढनिश्चयाबाबत आहे.

अनोख्या व्हॅक्युम क्लिनरची रचना केली

अनोख्या व्हॅक्युम क्लिनरची रचना केली

जेम्स डायसन यांना कदाचित तुम्ही नावाने ओळखत नसाल, पण त्यांच्या उत्पादनाबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती असेल. डायसन व्हॅक्यूम क्लीनर त्यांनीच बनवलेले लोकप्रिय उत्पादन आहे. शेकडो कंपन्या व्हॅक्यूम क्लीनर बनवतात, मग डायसन विशेष का? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. या कंपनीने जगातील पहिला बॅगलेस व्हॅक्यूम क्लीनर बनवला, ज्याच्या पाईपला बॅगशी जोडायची गरज नाही. खुद्द जेम्स डायसन यांनीच या व्हॅक्युम क्लिनरची रचना केली होती. भारतात मारवाडी लोक व्यवसायात यशस्वी होण्यासाठी प्रसिद्ध आहेत. जेम्स डायसन यांना इंग्लंडचे मारवाडी म्हटले तर वावगे ठरणार नाही.

सर जेम्स डायसन कोण?

सर जेम्स डायसन कोण?

वयाच्या 9व्या वर्षी जेम्स डायसन यांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले. पण कठोर परिश्रमाशिवाय काहीही साध्य होऊ शकत नाही, हे लहानपणापासूनच शिकले. बॅगलेस व्हॅक्यूम क्लीनर विकसित करण्यासाठी त्यांनी 5000 हून अधिक प्रोटोटाइप तयार केले, पण वारंवार त्यांना अपयश आले. पण, अखेरीस त्यांना यश मिळाले आणि जगभरात प्रसिद्ध झाले. त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 15 अब्ज डॉलर्स म्हणजे 1.43 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

एका छोट्या समस्येतून सुचली क्रांतिकारी कल्पना

एका छोट्या समस्येतून सुचली क्रांतिकारी कल्पना

जेम्स डायसन घरी साफसफाई करत असताना व्हॅक्युम क्लिनर वारंवार बंद पडत होता. अशावेळी बहुतेक लोकं मशीन बाजूला ठेवतात किंवा नवीन विकत घेतात, पण जेम्स यांनी मशीन उघडून पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की समस्या मशीनमध्ये नव्हती. समस्या डस्ट बॅगमध्ये होती. त्याच क्षणी एक विचार चमकला — ‘जर ही बॅगच काढून टाकली तर?’ आणि तिथूनच जन्म झाला एका क्रांतिकारी कल्पनेचा — Bagless Vacuum Cleaner.

5000 हून अधिक प्रोटोटाइपची चाचणी

5000 हून अधिक प्रोटोटाइपची चाचणी

कल्पना सोपी होती पण, तिचं यश अजिबात नाही. जेम्स यांनी एक-दोन नाही तर वर्षांत तब्बल 5127 प्रोटोटाइप तयार केले आणि टेस्टिंग केले. प्रत्येक वेळा काहीतरी चुकलं, प्रत्येक वेळा अपयश मिळालं, बऱ्याच वेळी लोकांनी हसून घेतलं पण त्यांनी पुन्हा प्रयत्न करून स्वतःला खात्री पटेपर्यंत थांबले नाही. अशाप्रकारे, जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी 1983 मध्ये पहिला बॅगलेस व्हॅक्यूम क्लीनर तयार केला.

डायसन बनला जागतिक ब्रँड

डायसन बनला जागतिक ब्रँड

1993 मध्ये त्यांनी जगातील पहिला बॅगलेस व्हॅक्यूम क्लीनर, DC01 बाजारात आणला, जो बघताच ब्रिटनमधील सर्वाधिक विकला जाणारा व्हॅक्यूम क्लीनर बनला आणि त्यानंतर डायसन यांनी मागे वळून पाहिले नाही. कंपनीने ब्लेडलेस पंखे, एअर प्युरिफायर, हँड ड्रायर आणि प्रीमियम हेअर स्टायलिंग साधनांची श्रेणी बाजारात आणली. हेअर स्टायलिंग साधने अनेक लोकांच्या wishlist बनू लागले. पण यशासोबतच डायसन यांना दुसरीकडे आव्हानांनाही सामोरे जावे लागले. त्यांचे वॉशिंग मशीन आणि इलेक्ट्रिक कारचे प्रकल्प पूर्णपणे अयशस्वी झाले, पण त्यांनी या अपयशांमधून धडा घेतला आणि आज जेम्स डायसन केवळ व्यावसायिक नाही, जेम्स डायसन फाउंडेशनच्या माध्यमातून तरुणांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदत देखील देतात.

बालपणीच वडिलांचं छत्र हरपलं अन् संघर्ष सुरू झाला

बालपणीच वडिलांचं छत्र हरपलं अन् संघर्ष सुरू झाला

2 मे 1947 रोजी इंग्लंडमधील नॉरफोक येथील क्रोमर येथे सर जेम्स डायसन यांचा जन्म झाला. काही वर्ष सगळं सुरळीत सुरू होतं, पण वयाच्या 9व्या वर्षी कर्करोगामुळे वडिलांचे छत्र हरपले. या दुःखद घटनेमुळे आयुष्यात संघर्ष सुरू झाला, पण त्यामुळे डायसन स्वावलंबीही बनले. इंग्लंडमधील ग्रेशॅम्स स्कूलमध्ये शिक्षण घेतले. डायसन एक average विद्यार्थी होते, पण त्यांना डिझाइन आणि गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यात प्रचंड रस होता.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा