Raksha Khadse: जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल आणि मुक्ताईनगर तालुक्यात चार दिवसांत झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीने हजारो हेक्टरवरील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या.
शेतकऱ्याने धरले खडसेंचे पाय(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, जळगाव: निसर्गाचा कोप आणि कर्जाचा डोंगर, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाची काळीज हेलावून टाकणारी व्यथा पुन्हा एकदा समोर आली आहे. ‘काहीही करा, पण शेतकऱ्यांना मदत द्या,’ अशी आर्त साद घालत एका संकटग्रस्त शेतकऱ्याने केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे पाय धरले. रावेर तालुक्यात सोमवारी (दि.८) नुकसानीची पाहणीसाठी आलेल्या खडसे या घटनेमुळे काही वेळ सुन्न झाल्या.
रावेर तालुक्यात उद्ध्वस्त झालेल्या केळीच्या बागा पाहून हताश शेतकऱ्याचा संयम सुटला. तो थेट मंत्र्यांच्या समोर आला आणि हात जोडून थेट त्यांच्या पाया पडला. ‘माझी मुलगी लग्नाची झाली आहे. ही फक्त माझीच नाही, तर इथल्या प्रत्येक शेतकऱ्याची व्यथा आहे, पण कोणी बोलत नाही. गरज पडली तर दिल्लीत जा, तिथे आपल्या ‘बाबां’ना (वरिष्ठ नेत्यांना) सांगा, आम्ही तुमच्या सोबत दिल्लीला यायला तयार आहोत, पण आम्हाला वाचवा,’ अशी विनवणी शेतकऱ्याने केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा