कोणकोणत्या कारणांमुळे रुपया घसरतो?
जेव्हा भारताकडून डॉलरची मागणी वाढते. तेव्हा त्याचा परिणाम रुपयावर होतो. डॉलरची मागणी जास्त आहे पण डॉलरचा पुरवठा कमी असेल तर रुपया घसरतो. भारताला कच्चा तेल, सोने. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, विविध मशीनरी तसेच औद्योगिक कामांसाठी लागणारा कच्चा माल परदेशातून आयात करावा लागतो. या आंतरराष्ट्रीय व्यवहारादरम्यान मोठ्या प्रमाणात डॉलर मोजावे लागतात. भारत जितक्या वस्तु परदेशातून आयात करेल तितकी डॉलरची मागणीही वाढेल आणि रुपयावर दबावही.
भारताला निर्यातीतून होणारी डॉलरची कमाई आयातीतून होणाऱ्या खर्चाच्या तुलनेने अधिक असेल तर रुपयावर होणारा दाब कमी करता येतो. उदाहरणार्थ, भारताने 100 Billion Dollars ची निर्यात केली आणि त्याचवर्षात 80 Billion Dollars ची आयात. एकंदरीत, त्या वर्षांच्या संपूर्ण व्यवहारात भारताला एकूण 20 Billion Dollars चा नफा होईल. त्यामुळे भारताकडे आधीच डॉलरचा साठा उपलब्ध असेल परिणामी डॉलरची मागणी कमी होईल आणि भारतीय रुपयावरील दबाव टाळता येईल. पण हे तेव्हाच शक्य असेल, जेव्हा आयातीपेक्षा निर्यातीवर जास्त भर देता येईल.
या 79 वर्षांमध्ये रुपया इतका कसा घसरला?
भारत 80 वा स्वातंत्र्यदिवस साजरा करत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 79 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 8 दशकांच्या कालावधीत भारताने अनेक चढउतार पाहिले आहेत. पण लक्षात घेण्याची बाब म्हणजे 1947 साली रुपया 3.30 रुपये इतका होता. तोच रुपया घसरून 2026 साली 95.45 रुपयांवर आला आहे. एकेकाळी भारताला 1 डॉलर मिळवण्यासाठी 3.30 रुपये मोजावे लागत होते आता त्याच 1 डॉलरची खरेदी करताना भारत 95.45 रुपये मोजत आहे.
रुपया घसरण्याची सुरुवात 1949 पासूनच सुरू झाली. त्याकाळी रुपया पाउंडशी जोडलेला होता. ब्रिटनने पाउंडचे मूल्य कमी केले आणि परिणामी रुपयाचेही मूल्य कमी झाले. अशाप्रकारे रुपया 3.30 रुपयेवरून घसरून 4.76 रुपयांवर आला. 1966 मध्ये भारत सरकारने स्वतःहून रुपयाचे मूल्य कमी केले. त्याकाळात भारतात औद्योगिक क्रांति होत होती आणि त्याचबरोबर भारत-पाकिस्तान युद्धही सुरू होते. अशामध्ये डॉलरची कमतरता भासत होती आणि आयात मोठ्या प्रमाणात होत होती. निर्यातवाढीसाठी भारताला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय वस्तूंच्या किंमती कमी करून निर्यात वाढवणे गरजेचे वाटत होते, जेणेकरून डॉलरचा तुटवडाही भरून निघेल. त्यामुळे 1966 साली रुपया 4.75 रुपयांवरून 7.50 रुपयांपर्यंत घसरवण्यात आले.
पुढे, 1970s आणि 80 च्या दशकात रुपया हळूहळू घसरत गेला. या काळात फक्त डॉलर पाहून रुपयाची किंमत ठरवण्यापेक्षा ट्रेडिंग पार्टनर्सच्या चलनांकडे विशेष लक्ष दिले जाऊ लागले. याच काळात भारताची अर्थव्यवस्था वाढू लागली. भारताला जास्त तेलाची, कच्च्या मालाची तसेच तांत्रिक गोष्टींची गरज भासू लागली, त्यामुळे आयात वाढू लागला. आयात निर्यातीच्या तुलनेने अधिक होऊ लागला, त्यामुळे देशाला डॉलरची गरज अधिक भासू लागली. या काळात भारतावर कर्ज वाढले. आधीच देशात डॉलरची कमतरता होती आणि त्यात घेण्यात आलेल्या कर्जावरील व्याजही डॉलरमध्ये मोजले जातात. या सगळ्या गोष्टींमुळे रुपया हळूहळू कमजोर झाला.
90 च्या दशकात भारतीय अधिकृत चलनात ऐतिहासिक बदल करण्यात आले. दशकाच्या सुरुवातीला गल्फ-वॉरमुळे तेलाच्या किंमती वाढल्या. भारताच्या आयातीचा दर वाढतच होता. भारताच्या डोक्यावरचे कर्ज आणि त्यावरील डॉलरमध्ये मोजण्यात येणारा व्याज वाढत जात होता. अशात या आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी आणि निर्यात वाढवण्यासाठी पुन्हा एकदा रुपयाचे मूल्य कमी करण्यात आले. 1993 साली रुपया पूर्णपणे बाजाराशी जोडण्यात आला.
पुढे 2008 आणि 2013 साली आंतरराष्ट्रीय बाजरव्यवस्थेत घडलेल्या घडामोडींमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात भारतीय शेअर्स विकले. परिणामी, डॉलरची मागणी वाढली आणि रुपयावर दबाव आला. 2013 साली रुपया 68.85 रुपये प्रति डॉलरवर पोहचला होता. 2014 नंतर तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे डॉलरची मागणी कमी झाली आणि रुपयावरील दबाव काही प्रमाणात हटला. पुढे 2018 साली पुन्हा एकदा रुपयावर दबाव तयार झाला. तेलाच्या किंमती वाढवण्यात आला तसेच डॉलर मजबूत होऊ लागला.
कोव्हीडच्या काळात जगभरातील आर्थिक हालचाली मोठ्या प्रमाणात मंदावल्या. अनेक गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी डॉलरकडे एक सुरक्षित पर्याय म्हणून पाहिले. परिणामी, डॉलर मजबूत झाला आणि रुपयावर दबाव आला. या काळात तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या, जे भारतीय रुपयासाठी फायदेशीर ठरल्या.
8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची पगारवाढ लांबणीवर; मे 2027 पर्यंत 18 महिने मुदत, मग अंमलबजावणीचा मुहूर्त? शिफारशी सादर केल्यावर पुढे काय समजून घ्या2025 साली एका डॉलरची किंमत 89 रुपये इतकी होती. मध्यंतरी, जगभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. जगभरात युद्धजन्य परिस्थिति आहेत. कच्च्या तेलाच्या किंमतीही आकाशाला भिडत आहेत, त्यामुळे रुपयावर मोठा दबाव आहे. आता रुपया 95.45 रुपये प्रति डॉलर इतका घसरला आहे. भविष्यात युद्धजन्य तनाव कमी झाला, कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या, भारतीय बाजारात परदेशी गुंतवणुका वाढल्या आणि भारताकडून होणारी निर्यात वाढली तर पुढे रुपयावर असणारा दबाव कमी करता येऊ शकतो.

