Headlines

Indian Cricketers : भारताचे 3 असे क्रिकेटर ज्यांनी आपल्या मित्राच्या बहिणींसोबतच केलेय लग्न, रोहित शर्माचाही समावेश – indian cricketers wedding his friend sisters rohit shrma ajit agarkar and gundappa viswanath


Indian Cricketers Wedding his friend sisters : क्रिकेटच्या मैदानात एकत्र खेळलेले अनेक खेळाडू एकमेकांचे नातेवाईक झाले आहेत. यामध्ये भारताचे असे काही खेळाडू ज्यांनी आपल्या मित्राच्या बहिणीसोबतच लग्न केले. या यादीत शेवटचे नाव ज्या खेळाडूचे आहे ते कदाचित तुम्हाला माहिती नसेल, कोण-कोण आहेत ते खेळाडू जाणून घ्या.

Indian Cricketers Wedding his friend sisters
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : क्रिकेटच्या मैदानात खेळताना खेळाडूंची झालेली मैत्री पुढे नात्यात बदलली. काही खेळाडूंनी मित्राच्या बहिणीसोबतच लग्न केले. अनेक खेळाडू आहेत जे देशासाठी एकत्र खेळले आणि पुढे एकमेकांचे नातेवाईक झाले. यामध्ये भारताच्या आजी-माजी खेळाडूंचाही समावेश आहे. या यादीमधील एक नाव असे आहे ज्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही.

भारताचे माजी खेळाडू सुनील गावसकर ज्यांना लिटल मास्टर म्हणूनही ओळखलं जातं. सुनील गावसकर यांची लहान बहिण कविता यांचा विवाह माजी खेळाडू गुंडप्पा विश्वनाथ यांच्याशी झाला होता. गावसकर आणि विश्वनाथ हे दोघेही १९७०-७१ मध्ये एकत्र वेस्ट इंडिज दौऱ्यावर होते. त्यावेळी एकाच रूममध्ये राहिले होते, तिकडून आल्यावर गावसकर यांनी विश्वनाथ यांना आपल्या घरी बोलवले होते. घरी आल्यावर गावसकर यांची लहान बहिण (कविता) गुंडप्पा विश्वनाथ यांनी पाहताच क्षणी आवडली होती. मात्र त्यावेळी कविता या १८ वर्षांच्या होत्या. त्यानंतर त्यांनी वाट पाहिली आणि योग्य वेळी गावसकर यांच्या घरी जात कविता यांच्यासंदर्भात बोलणी केली त्यानंतर दोन्ही परिवारांनी विवाह केला.

Maharashtra TimesWomen Asia Cup Schedule 2026 : महिला आशिया कपला आजपासून सुरूवात, भारत वि. पाकिस्तान सामना केव्हा? संपूर्ण शेड्यूल जाणून घ्याभारताचा स्टार खेळाडू रोहित शर्मा ज्याला हिटमॅनही म्हणून ओळखलं जातं. रोहित शर्माने २०१५ मध्ये रितीका सजदेहसोबत विवाह केला होता. पण तुम्हाला माहिती का? रितीका ही माजी खेळाडू युवराज सिंग याची मानलेली बहिण आहे. स्वत: रोहित शर्माने सांगितलेलं की एका शुटवर गेलेला तेव्हा तो युवराजला भेटायला गेल्यावर त्यावेळी रितीका तिथेच बसलेल होती. युवराजने आधीच सांगितलं माझी बहिण आहे, तिच्याकडे पाहुपण नकोस. मी सर्व शूट होईपर्यंत तिच्याकडे रागाने पाहत होतो की कोण आहे ही इतकी, पण काही वेळाने शुटदरम्यान मी खाली गेलो तर रितिका म्हणाली की, तुला काही मदत लागत असेल तर सांग. तिथूनच दोघांची जवळीक वाढली आणि काही वर्षांनी पुढे विवाहही केला.

Maharashtra TimesDevdutt Padikkal Jersey : बाप रे, हे काय! देवदत्त पडिक्कलच्या अंगावर उमटला पाठीवरच्या जर्सीचा टॅटू; फोटो तुफान व्हायरल
आताचे भारतीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनीही त्यांचे मित्र मुंबईसाठी खेळणाऱ्या मजहर यांच्या बहिणीसोबत विवाह केला आहे. १९९९ मध्ये मजहर यांच्या बहिणीसोबत (फातिमा) एका मॅचवेळी ओळख झाली. अनेक मॅचेसदरम्यान या भेटी वाढल्या आणि दोघांमधील मैत्री वाढली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले पण आगरकर हे ब्राह्मण समाजाचे आणि फातिमा या मुस्लिम समाजाच्या असल्याने दोघांच्या कुटुंबियांनी विरोध केलेला. पण त्यांनी हार मानली नाही आणि आपल्या कुटुंबियांना समजावलं आणि २००२ मध्ये दोघांनी लग्न केले.