Headlines

भारतीय महिला हॉकी संघाने घडविला इतिहास, सगळ्याच खेळाडूंचा पहिला वर्ल्डकप; ५२ वर्षांत पहिल्यांदाच अशी कामगिरी


Women’s Hockey World Cup News : भारतीय महिला संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडला होता.मात्र पहिलाच वर्ल्ड कप असणाऱ्या भारताच्या खेळाडूंनी शेवट मात्र गोडा केला आहे. जर्मनीला पराभूत करत इतिहासात रचलाय, जाणून घ्या.

Womens Hockey Team India
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : गेल्या ५२ वर्षात भारताच्या महिला संघाने प्रथमच वर्ल्ड कप हॉकी स्पर्धेत सर्वोत्तम पाचवा क्रमांक पटकावला. नवनीत कौर हिच्या दोन गोलमुळे भारताने जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असणाऱ्या जर्मनीसारख्या आव्हानात्मक प्रतिस्पर्ध्याला ३-१ असे जेरिस आणत इतिहास घडविला. या स्पर्धेत भारताने फक्त एकच लढत गमावली. १९७४मध्ये अजिंदर कौर यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या वहिल्या वर्ल्ड कपमध्ये चौथा क्रमांक पटकावला होता. ती भारताच्या महिला संघाची वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.

अखेरच्या १७ मिनिटात तीन गोल

जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावरील भारताला यंदाच्या स्पर्धेत फक्त यजमान अन् ऑलिम्पिकविजेत्या नेदरलँड्सकडून (०-२) पराभव पत्करावा लागला होता. साखळीतील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला गोलशून्य बरोबरीत रोखल्यानंतर भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला. ही कसर प्रशिक्षक शुअर्ड मरिन यांच्या संघाने जर्मनीविरुद्धच्या लढतीत अखेरच्या १७ मिनिटांत तीन गोल करून भरून काढली. भारतासाठी इशिका (४३वे मिनिट), नवनीत (४४ आणि ४७) यांनी गोल केले. जर्मनीसाठी लिन क्रिंग्स हिने ५९व्या मिनिटाला एकमेव गोल केला. याच जर्मन संघाने स्पर्धेपूर्वीच्या दोन सराव सामन्यांत भारताला हरवले होते.

Maharashtra TimesHocky India vs Argentina : हॉकी वर्ल्डकपमधून भारताचं पॅकअप, अर्जेंटिनानकडून 5-3ने पराभव; शेवटचा वर्ल्डकप केव्हा जिंकलेला?
पाचव्या क्रमांकासाठीच्या या लढतीत पहिली ४३ मिनिटे प्रतिस्पर्धी संघ फक्त एकमेकांना आजमावत राहिले पण यश मिळाले नाही. अखेरच्या सतरा मिनिटांत भारताने जबरदस्त पासिंग, उत्कृष्ट फिनिशिंग आणि भक्कम बचावाचे प्रदर्शन करत जर्मनीला सावरण्याची संधीच दिली नाही. जर्मनीला सामन्यात पाच पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण भारताची गोलकीपर आणि बचावफळी यांची तटबंदी भेदण्यात कसलेले जर्मन आक्रमण निष्फळ ठरले.

Maharashtra TimesIndian Cricketers : भारताचे 3 असे क्रिकेटर ज्यांनी आपल्या मित्राच्या बहिणींसोबतच केलेय लग्न, रोहित शर्माचाही समावेश
भारतीय संघातील ११ खेळाडू कारकिर्दीत प्रथम वर्ल्डकप खेळत होत्या. या खेळाडूंनी जर्मनीविरुद्ध मिळवलेला विजय पाहून प्रशिक्षक मारिन यांच्यासोबत ड्रॅगफ्लिक प्रशिक्षक ताइके ताकेमा आणि विश्लेषणाचे प्रशिक्षक मथियास विला अक्षरशः उड्या मारत होते. यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला आहे.

महिला भारतीय संघाचा वर्ल्ड कपमधील प्रवास

सलामीच्या सामन्यात ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या चीनला २-२ने बरोबरीत रोखणाऱ्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ६-१ असे हरवले होते, पण नंतर इंग्लंडविरुद्ध बरोबरीत समाधान मानावे लागले. तर दुसऱ्या फेरीत नेदरलँड्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला, पण त्यावेळीही यजमान नेदरलँड्सने दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नरवर केले होते.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा